‘इंग्रजीचं अवडंबर शोषितांसाठी अन्यायपूर्ण’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मोदींच्या हस्ते वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन झालं आहे. ही ट्रेन मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशी धावणार आहे. मोदी या कार्यक्रमानंतर अंधेरी पूर्वतील मरोळ येथील दाऊदी बोहरी समाजाच्या अल जामिया तुस सफिया या युनिव्हर्सिटीचं उद्घाटन देखील करण्यात आलं. सैय्यदनांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. अल जामिया-तुस-सैफिया […]

‘इंग्रजीचं अवडंबर शोषितांसाठी अन्यायपूर्ण’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मोदींच्या हस्ते वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन झालं आहे. ही ट्रेन मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशी धावणार आहे. मोदी या कार्यक्रमानंतर अंधेरी पूर्वतील मरोळ येथील दाऊदी बोहरी समाजाच्या अल जामिया तुस सफिया या युनिव्हर्सिटीचं उद्घाटन देखील करण्यात आलं. सैय्यदनांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. अल जामिया-तुस-सैफिया केंद्राचे उद्घाटन झाले हे अलजामीया-तुस-सैफिया हे अरबी भाषा प्रशिक्षण केंद्र आहे.

यावेळी सैय्यदना यांनी भावना व्यक्त करत ‘हा आमच्यासाठी गौरवाचा क्षण असल्याचे म्हंटले. वीस वर्षापूर्वी या केंद्राची सुरूवात सुरतेत करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांनी आम्हाला नेहमी प्रोत्साहन दिलं आहे. भाषेचा प्रसार मानवाच्या कल्याणासाठी उपयोगी तसेच ‘हिंदुस्थानाची प्रगती होवो, मोदींना दीर्घायु मिळो’ असे ते म्हणाले.

तसेच यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले. ” मी तुमच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून कार्यक्रमात सहभागी झालो आहे. मी सैय्यदनांच्या चार पिढ्यांसोबत संपर्कात राहिलो आहे. दाऊदी बोहरा समाज देशासाठी कार्यरत आहे. या भाषा केंद्राचे स्वप्न दीडशे वर्षांनी पूर्ण झाले आहे हा आनंदाचा क्षण असून बोहरा समाज आणि माझं खूप जुनं नातं आहे. जलशुद्धीकरणाच्या कामात बोहरा समाज नेहमी सक्रीय असतो. हाच तुमचा स्नेह मला आकर्षित करतो. दांडी यात्रेचं स्मारक सैय्यदनांमुळेच बनू शकलं आहे. आमच्या सरकारनं उच्च शिक्षणाचा वेगवान प्रसार करत असून देशात दर आठवड्याला एक विद्यापीठ, दोन महाविद्यालयं सुरू होत आहेत. आमचं सरकार व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहे तसेच उद्योगपतींमध्ये उत्साह वाढवण्याचा आमचा प्रयत्न देखील आमच्याकडून करण्यात येत आहे.” असे पंतप्रधान मोदी म्हणाले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number