कलाटे यांची मनधरणी सुरूच

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी सगळेच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. यात पक्षातील काही इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यानं नाराजी नाट्य सुरू झालं ते आजपर्यंत सुरूच आहे. यापैकी कसब्यात काँग्रेस आणि भाजपला आपापल्या पक्षातील नाराज नेत्यांची समजूत काढण्यात यश आले आहे. परंतु, चिंचवडमध्ये एकीकडे महाविकास […]

कलाटे यांची मनधरणी सुरूच

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी सगळेच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. यात पक्षातील काही इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यानं नाराजी नाट्य सुरू झालं ते आजपर्यंत सुरूच आहे. यापैकी कसब्यात काँग्रेस आणि भाजपला आपापल्या पक्षातील नाराज नेत्यांची समजूत काढण्यात यश आले आहे.

परंतु, चिंचवडमध्ये एकीकडे महाविकास आघाडीतर्फे नाना काटे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मात्र शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनंती करुनही राहुल कलाटे हे माघार घ्यायला तयार नाहीत. अखेर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी राहुल कलाटेंची भेट घेतली.

महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याच ठरल्यावर राहुल कलाटे आणि नाना काटे यांची नावे चर्चेत होती. उमेदवारीचा तिढा सुटत नसताना अखेर नाना काटे याना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर राहुल कलाटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कलाटे हे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकित अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी नेत्यांनी समजूत काढूनही राहूल कलाटे अपक्ष अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता थेट ठाकरे गटाचे सचिन अहिर राहुल कलाटे यांच्या भेटीला चिंचवडमध्ये दाखल झाले आहेत.

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने कलाटे अहिर यांचं ऐकणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राहुल कलाटे यांना मागील निवडणुकीत १ लाखाहूनही अधिक मते मिळाली होती. तसेच जनतेचा माझ्यावर विश्वास असल्याचे त्यांनी अपक्षचा उमेदवारीचा अर्ज भरताना सांगितले होते. त्यानंतर महाविकास आघाडीने धसका घेतला आहे. मते विभागली जाऊ नयेत. यासाठी आघाडी प्रयत्नशील असून ते राहुल कलाटे यांना माघार घेण्यासाठी विनंती करत आहेत. परंतु आजपर्यंत कलाटे यांनी अर्ज मागे घेतला नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number