राहुल गांधींचे पंतप्रधानांना प्रश्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतले उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरून संसदेत घमासान सुरूच आहे. या मुद्दयावरून मोदी सरकारची जाम पंचाईत झालेली दिसतेय. आता अदानीवरून राहुल गांधींचे पंतप्रधानांना ७ प्रश्न चर्चचा विषय ठरले आहेत त्यावर मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे परंतु हे प्रश्न कोणते होते ते पाहूया. १. अदानीच्या देशाबाहेर काही बनावट कंपन्या आहेत, असे हिंडनबर्गच्या […]

राहुल गांधींचे पंतप्रधानांना प्रश्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतले उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरून संसदेत घमासान सुरूच आहे. या मुद्दयावरून मोदी सरकारची जाम पंचाईत झालेली दिसतेय. आता अदानीवरून राहुल गांधींचे पंतप्रधानांना ७ प्रश्न चर्चचा विषय ठरले आहेत त्यावर मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे परंतु हे प्रश्न कोणते होते ते पाहूया.

१. अदानीच्या देशाबाहेर काही बनावट कंपन्या आहेत, असे हिंडनबर्गच्या अहवालात म्हटले आहे. या कंपन्या कोणाच्या आहेत ते मोदी सरकारने सांगावे.

२. बनावट कंपन्यांमधून नेमका कोणाचा पैसा भारतात येतो?

३. भारताची बंदरे, विमानतळ, संरक्षण क्षेत्र आता अदानीच्या ताब्यात आहे. तनरीही आतापर्यंत भारत सरकारने त्यांच्या या शेल कंपन्यांबद्दल कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही. हा खरेतर अत्यंत गंभीर असा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे.

४. पंतप्रधान महोदय, परदेश दौऱ्यांमध्ये किती वेळा अदानी तुमच्यासोबत होते?

५. मोदीजी, परदेश दौऱ्यांमध्ये अदानी तुम्हाला किती वेळा भेटले?

६. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांनंतर, अदानीने किती वेळा त्या देशांना भेट दिली?

७. अदानीने भाजपला किती पैसे दिले आहेत? अदानीने इलेक्टोरल बाँडमध्ये किती पैसे दिले आहेत?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number