‘अधिवेशन ५ आठवड्यांचं घ्या’

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तयारी सुरू झाली आहे. या निमित्तानं नुकतीच विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अत्यंत महत्त्वाची मागणी केली आहे. राज्यातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवडे घ्यावे अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. […]

‘अधिवेशन ५ आठवड्यांचं घ्या’

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तयारी सुरू झाली आहे. या निमित्तानं नुकतीच विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अत्यंत महत्त्वाची मागणी केली आहे. राज्यातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवडे घ्यावे अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

‘नागपूरचं हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी असतानाही हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आलं नाही. त्यामुळे राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्यांचं घ्यावं, अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली. तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृतमहोत्सव सर्वपक्षीयांच्या सहभागातून भव्य प्रमाणात साजरा करावा अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number