सध्या राजकारणात चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. चिंचवड येथे भाजपचे दिव्यांगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एकीकडे चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवाराने अर्ज दाखल करून प्रचार देखील सुरु केला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवारीचा घोळ अजूनही कायम आहे. सबा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष आणि चिंचवड मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं असले तरी राष्ट्रवादी शांत आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी नाना काटे, राजेंद्र जगताप, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडव राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार समोर आले आहेत परंतु राष्ट्रवादी चिंचवड येथे उमेदवारी देणार नाही, असे लक्षात येत आहे. याच कारण म्हणजे चिंचवड येथे उमेदवारी न देऊन जगताप कुटुंबावर आपला प्रभाव टाकण्याची राष्ट्रवादीची खेळी असू शकते.