‘वरळीत माझ्याविरोधात निवडणूक लढा’

शिंदे गट आणि ठाकरे गट. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु असतात. तर त्यात आता आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज दिले आहे. ”मी राजीनामा देतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राजीनामा द्यावा, आणि वरळीत माझ्याविरोधात उभे राहून निवडणूक लढावी”, असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलं आहे. आदित्य ठाकरे वारंवार […]

‘वरळीत माझ्याविरोधात निवडणूक लढा’

शिंदे गट आणि ठाकरे गट. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु असतात. तर त्यात आता आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज दिले आहे. ”मी राजीनामा देतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राजीनामा द्यावा, आणि वरळीत माझ्याविरोधात उभे राहून निवडणूक लढावी”, असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलं आहे.

आदित्य ठाकरे वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणुका घेण्यासाठी आव्हान देत असतात. तर आता पुन्हा एकदा मुंबईमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे चॅलेंज दिलं आहे. तसेच ”जेवढे खोके वाटायचे ते वाटा मात्र, एकही मत विकलं जाणार नाही”, असं म्हणत ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावला.

आदित्य ठाकरे म्हणाले,’जी यंत्रणा लावायचीये लावा, जी ताकद लावायचीये लावा, जेवढे खोके वाटायचेयत वाटा, पण एकही मत विकलं जाणार नाही. एकही शिवसैनिक विकला जाणार नाही. अशी घणाघाती टीका करत थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं आहे.

पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्राचे 13 खासदार आणि 40 आमदार ज्यांनी गद्दारी केली आहे. पण त्या सर्वांना मी आजही चॅलेंज देतो. तुम्ही तुमच्या आमदारकी, खासदारकीचा राजीनामा द्या. पुन्हा निवडून कसे येता, ते दाखवाच. मी तर या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनाही चॅलेंज दिलंय. मी वरळीतून राजीनामा देतो, तुम्ही माझ्यासमोर वरळीतून उभे राहा, तुम्ही कसे निवडून येताय, ते मी बघतो.” असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज दिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number