काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात वक्तव्य केले होते. संजय राऊत हे आपल्यामुळे खासदार झाले. त्यासाठी आपण पैसे खर्च केले असा दावा राणे यांनी केला होता. परिणामी आपली बदनामी झाल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात मी कायदेशीर नोटीस दिली आहे. त्यांनी एक तर माफी मागावी किंवा कोर्टात त्यांचं वक्तव्य सिद्ध करावं, असं आव्हान संजय राऊत यांनी केले आहे.
‘नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांना मी भाजपाचे पोपटलाल समजतो. मागचा पुढचा विचार न करता ते फक्त पोपटासारखे बोलत राहतात. त्यामुळे या दोघांविरोधात मी कायदेशीर नोटीस पाठवून न्यायालयात उत्तर द्यायला लावू’, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात वक्तव्य केले होते. ‘२००४ साली नारायण राणे यांनीच संजय राऊत यांना खासदार केलं. त्यावेळी त्यांचं नाव मतदार यादीत नव्हतं, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. यावरून संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. तुम्ही मला खासदार केलं तर तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे काय करत होते? असा सवाल संजय राऊत यांनी नारायण राणे याना केला आहे.