मोबाईल फोन स्वस्त होणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या कार्यकालातील हे पाचवे आणि मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकालातील हे अखेरचे बजेट आहे. अर्थमंत्री यांनी आज बजेट सादर करताना काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. तसेच काय स्वस्त होणार आणि काय महागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. इलेक्ट्रिक गाड्या, परदेशातून आयात होणारी खेळणी, […]

मोबाईल फोन स्वस्त होणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या कार्यकालातील हे पाचवे आणि मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकालातील हे अखेरचे बजेट आहे. अर्थमंत्री यांनी आज बजेट सादर करताना काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. तसेच काय स्वस्त होणार आणि काय महागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

इलेक्ट्रिक गाड्या, परदेशातून आयात होणारी खेळणी, सायकल, कॅमेरा लेन्स, मोबाईल फोन्स, एलईडी टीव्ही, लिथियम आयर्न, बायोगॅस संबंधीत उपकरणे स्वस्त होणार आहेत. मोबाईल फोन्सला प्रोत्साहन मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाईल प्रोडक्शन ५.८ कोटी यूनिट पर्यंत वाढले आहे. कॅमेरा लेन्स, पार्ट्स आणि बॅटरीच्या आयातीवरील आयात शुल्क कमी केले जाणार आहे. याशिवाय, टीव्ही पॅनेलच्या आयात शुल्कात सुद्धा २.५ टक्के कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे मोबाईल आणि स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number