उद्धव पाय उतार होणार ?

शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झाले होते. यानंतर दोन्ही गटांनी शिवसेना पक्षावर दावा केल्यानंतर मुळ शिवसेना पक्ष कुणाचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर हा वाद सध्या निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुरू आहे. त्यातच आता नवीन पेच ठाकरे गटासमोर आला आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या धनुष्यबाणाच्या […]

उद्धव पाय उतार होणार ?

शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झाले होते. यानंतर दोन्ही गटांनी शिवसेना पक्षावर दावा केल्यानंतर मुळ शिवसेना पक्ष कुणाचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर हा वाद सध्या निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुरू आहे. त्यातच आता नवीन पेच ठाकरे गटासमोर आला आहे.

महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या धनुष्यबाणाच्या दाव्यावर काल केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी पार पडली. यावेळी आयोगाकडून निर्णय राखून ठेवत 17 जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या युक्तिवादावेळी उद्धव ठाकरेंचे ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख घटनाबाह्य असल्याचे सांगण्यात आले.

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे गटाकडून पक्षाचे चिन्ह धनुष्यबाणाची कायदेशीर लढाई सुरू असताना आता दुसरीकडे पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे आता आयोग व न्यायालय नक्की कुणाच्या बाजूने निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 23 जानेवारी 2018 मध्ये कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख पदाची निवड झाली होती. ही निवड 5 वर्षांसाठी करण्यात येते. ही मुदत 23 जानेवारी 2023 ला संपत आहे.

दरम्यान हा पेच लक्षात घेता उद्धव गटाने काय भूमिका घेणार आहे त्यावर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई म्हणतात की, ‘आम्ही अंतर्गत निवडणूक घेण्याची परवानगी मागितली आहे. यात राष्ट्रीय कार्यकारणीची निवडही आहे. निवडणूक आयोगासमोर आम्ही आमची बाजू मांडणार आहोत. आयोगाने आमच्या मागणीचा प्राधान्याने विचार करावा. जर आयोगाला पक्षांतर्गत निवडणुका घेण्यावर काही आक्षेप असेल, तर त्यांनी निर्णय होईपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत वाढवावी,’ अशीही मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number