‘फडणवीसच आमच्या मनातील मुख्यमंत्री’

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वाचा डंका महाराष्ट्रात तर वाजतोच आहे, पण इतर राज्यातही त्यांच्या कामाचं कौतुक होतं. समाजातील घटकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका आणि धडाकेबाज कामासाठी फडणवीस नेहमी आपले वाटतात. सगळ्यांसाठी ते उपमुख्यमंत्री असतील पण आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असे वक्त्यव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केले आहे. नवनीत राणा यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे […]

‘फडणवीसच आमच्या मनातील मुख्यमंत्री’

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वाचा डंका महाराष्ट्रात तर वाजतोच आहे, पण इतर राज्यातही त्यांच्या कामाचं कौतुक होतं. समाजातील घटकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका आणि धडाकेबाज कामासाठी फडणवीस नेहमी आपले वाटतात.

सगळ्यांसाठी ते उपमुख्यमंत्री असतील पण आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असे वक्त्यव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केले आहे. नवनीत राणा यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे उपस्थितांच्या बुवया उंचावल्या आहेत.

अमरावतीच्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. अमरावतीसाठी पदवीधर मतदार संघातून डॉ. रणजीत पाटील यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यांच्या प्रचारार्थ अमरावतीच्या दसरा मैदानावर भाजप नेत्यांची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार प्रवीण पोटे उपस्थित होते.

नवनीत राणा म्हणतात, “देवेंद्र फडणवीस यांचं जिथे जिथे पाऊल पडलं मग गुजरात असो वा गोवा तिथे भारतीय जनता पक्षाला नेत्रदीपक यश मिळालं. फडणवीस यांचं काम बोलतं. त्यांच्या कामाची स्टाईल धडाकेबाज आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा डंका महाराष्ट्रात तर वाजतोच आहे, पण इतर राज्यातही त्यांच्या कामाची चर्चा होते. सगळ्यांसाठी ते उपमुख्यमंत्री असतील पण आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत”, असे नवनीत राणा यांनी बोलून दाखवले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number