मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला मंगळवारी धमकीचा फोन आला ज्यामध्ये शाळा उडवून देण्याची धमकी दिली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी शाळेला धमकीचा फोन आला ज्यामध्ये अज्ञात व्यक्तीने शाळा उडवून देण्याची धमकी दिली. सायंकाळी 4.30 वाजता शाळेच्या लँडलाइनवर कॉल आला.फोन करणाऱ्याने शाळेत टाईम बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. यानंतर कॉलरने कॉल डिस्कनेक्ट केला. फोन आल्यानंतर शाळेत एकच गोंधळ उडाला. या फोन कॉलनंतर लगेचच शाळा प्रशासनाने स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.
शाळेच्या तक्रारीच्या आधारे,धमकीचे फोन आल्यानंतर शाळेने स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. शाळेच्या तक्रारीच्या आधारे, BKC पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात कॉलरविरुद्ध आयपीसीच्या कलम 505 (1) (b) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी फोन करणार्याचा शोध घेतला असून लवकरच आरोपीला अटक करणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलला देखील धमकीचा कॉल आला होता ज्यादरम्यान अज्ञात कॉलरने हॉस्पिटल उडवून देण्याची आणि अंबानी कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती.