‘आक्षेप आयोगावर नाही’

काही दिवसांत अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. वाघ आणि उर्फी यांच्या वादात आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही लक्ष्य करण्यात येत आहेत. यानंतर महिला आयोगाकडून वाघ यांना नोटीस पाठविण्यात आली. या नोटिशीनंतर संतापलेल्या चित्रा वाघांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चुकीची व्यक्ती बसली असल्याचं म्हणत रुपाली चाकणकरांवर टीका […]

‘आक्षेप आयोगावर नाही’

काही दिवसांत अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. वाघ आणि उर्फी यांच्या वादात आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही लक्ष्य करण्यात येत आहेत. यानंतर महिला आयोगाकडून वाघ यांना नोटीस पाठविण्यात आली. या नोटिशीनंतर संतापलेल्या चित्रा वाघांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चुकीची व्यक्ती बसली असल्याचं म्हणत रुपाली चाकणकरांवर टीका केली होती. उर्फी जावेदवरुन सुरु असलेला वाद राजकीय वळण घेत असून महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या पावित्र्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ या अधिक आक्रमक झाल्या आहेत.

यावादात अनेकांनी उड्या घेत एकमेकावर आरोप-प्रत्यारोप केले आहे. दरम्यान महिला आयोगावर चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपानंतर महिला आयोगाने वाघ यांना नोटीस दिली. यादरम्यान चित्रा वाघ यांनी नोटीसीवरून, रुपाली चाकणकर यांच्यावरही टीका केली. चाकणकर तुमचा पेपर सुप्रियाताईंच्या दरबारात सोडवा. अभ्यास… अभ्यास करू नका. मी ही यापूर्वी आयोगावर होते. आपण आता आलात. तुम्ही नोटीस दिली त्याला उत्तर दिले आहे. ते उत्तर पण प्रसिद्ध करा. मी उत्तर आयोगाला दिलं आहे व्यक्तीला नाही. आयोग उत्तम काम करीत आहे व्यक्तीवर आक्षेप आहे, असंही त्या म्हणाल्या.

चित्रा वाघ म्हणाल्या, मला नोटीस दिली दुःख नाही. रोज छप्पन येतात. ही सत्तावन्नवी. या आयोगावर त्या आत्ता आल्या आम्ही काम करुन गेलो. आक्षेप आयोगाला नाही. आक्षेप चेअरपर्सनच्या कार्यपद्धतीला आहे. सुप्रिया सुळे, शरद पवार नागड्या उघड्यांचे समर्थन करणार नाही.असे देखील त्या म्हणाल्या.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number