तुरूंगातून बाहेर येताच शिंदेंना पत्र

मनी लाँड्रिंग प्रकरणी एका वर्षाहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर आमदार आणि माजी मंत्री अनिल देशमुखांना जामीन मिळाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुखांनी मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलं असून, मतदारसंघातील मागणीसंदर्भात एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. अनिल देशमुख पत्रात म्हणतात, ‘काटोल व नरखेड तालुक्यातील विशेषतः नरखेड तालुक्यातील जनतेला नागपूर येथे न्यायालयीन कामासाठी ये-जा फार त्रासदासक होतं. […]

तुरूंगातून बाहेर येताच शिंदेंना पत्र

मनी लाँड्रिंग प्रकरणी एका वर्षाहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर आमदार आणि माजी मंत्री अनिल देशमुखांना जामीन मिळाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुखांनी मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलं असून, मतदारसंघातील मागणीसंदर्भात एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.

अनिल देशमुख पत्रात म्हणतात, ‘काटोल व नरखेड तालुक्यातील विशेषतः नरखेड तालुक्यातील जनतेला नागपूर येथे न्यायालयीन कामासाठी ये-जा फार त्रासदासक होतं. यामुळे काटोल येथेच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाची मागणी होत होती.’‘त्या संदर्भात नरखेड व काटोल तालुका वकील संघाने सुद्धा मागणी केली होती. याला मंजुरी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी वकील संघटनांसोबत चर्चा करुन यावर कसा तोडगा काढता येईल, यासाठी प्रयत्न केले आहे. याला प्राथमिक मान्यता मिळण्यासाठी मुंबई येथील उच्च न्यायालयात प्रस्ताव सादर करण्यात आला.’

‘या प्रस्तावाला मुंबई उच्च न्यायालयाच्या समितीनं तत्वत: मान्यता दिली असून, पुढील मंजुरीसाठी तो राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाला पाठविला आहे. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय काटोल येथे सुरु झाल्यास याचा मोठ्या प्रमाणात नरखेड व काटोल तालुक्यातील जनतेला होणार आहे. यामुळे याला तातडीनं मंजुरी मिळाल्यास हे न्यायालय लवकरात लवकर सुरु होईल’, अशी मागणी देशमुखांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number