‘माझ्या नादाला लागू नका’-संजय राऊत

भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर नुकतीच टीका केली आहे. त्यांच्या टीकेला आता राऊतांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला जेलमध्ये टाकण्याची भाषा करत आहेत. यांच्यासारखे आम्ही पळपुटे नाही. आम्हाला ईडीची नोटीस आली […]

‘माझ्या नादाला लागू नका’-संजय राऊत

भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर नुकतीच टीका केली आहे. त्यांच्या टीकेला आता राऊतांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला जेलमध्ये टाकण्याची भाषा करत आहेत. यांच्यासारखे आम्ही पळपुटे नाही. आम्हाला ईडीची नोटीस आली कि आम्ही तुमच्यासारखा पळून गेलो नाही. ईडीची नोटीस येतच आम्ही तुमच्या सारखे पक्ष बदलणाऱ्यांपैकी नाही. मी नामर्द नाही, एक सांगून टाकतो माझ्या कुणीही नादाला लागू नका. मी जर आर्थिक प्रकरणे बाहेर काढली ना तर ५० वर्ष नारायण राणे सुटणार नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी नारायण राणे यांना थेट इशारा दिला.

राऊत म्हणाले की, “नारायण राणे यांच्या सारखे आम्ही डरपोक आणि पळपुटे नाही. ईडीची नोटीस येताच आम्ही पक्षही बदललेला नाही. एकेकाळी ते आमचे सहकारी होते त्यामुळे मी अजून त्यांच्यावर काहीच बोललेलो नाही. मात्र, आज बोलतो. आम्हाला धमक्या देऊ नका. आणि धमक्या देणार असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या मग दाखवतो मी. माझ्या नादाला लागू नका, झाकली मूठ सव्वा लाखांची.” असा घणाघात राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर केला आहे.

मी नारायण राणेंवर कधीही आग्रलेख लिहिला नाही. ते म्हणत असतील हे कारागृहात जाणार आहेत, तर त्यांनी आमचा कारागृहात जाण्याचा मार्ग मोकळा करू द्यावा. त्यांच्यासारखे आम्ही डरफोक आणि पळपुटे-भित्रे नाहीत. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाहीत,परत सांगतो मी हे काय मला जेलमध्ये टाकणार? मी माझ्या हिंमतीने जेलमध्ये गेलो आहे माझ्या पक्षासाठी. तुमच्यासारखा पळून नाही गेलो ईडीने बोलवल्यावर शरणागतीही पत्करली नाही. आम्ही नामर्द नाही आहोत, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत हे लक्षात ठेवा, मला टाकणार का जेलमध्ये या सर्क नोंदी आहेत माझ्याकडे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number