पंढरपूरचा विठुराया अनके भाविकांचं श्रद्धा स्थान आहे. विठुरायाच्या चरणी लाखो भाविक मोठ्या संख्येने दान करत असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशांसह दागदागिन्यांचाही समावेश असतो. मात्र त्या संदर्भात मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. विठ्ठलाच्या दानपेटीत चक्क नकली सोन्या-चांदीच्या वस्तू आढळल्या आहेत.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वर्ष भरात लाखो भाविक येत असतात. अनेक जण आपले नवस पूर्ण झाल्याच्या भावनेने रोख रक्कम, सोन्याचे,चांदीचे दागिने दान करत असतात. देवाची दान पेटी मोजताना यात अनेक प्रकारचे दागिने आढळतात. या दागिन्यांना सराफाकडून तपासून घेतले जाते. यातील खरे असणारे दागिने व्यवस्थीत बाजूला ठेवले जातात. यात अनेक दागिने सोन्या चांदी सारखे दिसणारे पण त्याला पॉलिश केलेले किंवा बेंटेक्स प्रकारचे आढळले आहेत. भाविकांनी दान करत चक्क विठ्ठलाच्या पायी अर्पण केल्या सोन्या-चांदीच्या पोतभर वस्तू आढळल्या आहेत.
नकली सोन्या-चांदीच्या वस्तूबाबत लवकरच मंदिर समिती बैठकीत होणार असून लवकरच निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलं आहे. मनी मंगळसूत्र पाळणे जोडवे आधी सोन्या-चांदीच्या नकली वस्तूंचा खजिना आढळून आला आहे . भाविकांनी श्रद्धेने देवाला काय अर्पण करावे हा त्यांच्या भावनेचा विषय आहे. पण सोने समजून दुसरी नकली वस्तू कोणी विक्री करत असेल तर भाविकांनी काळजी घ्यावी किंवा पावती घ्यावी जेणे करून फसवणूक होणार नाही, असे आवाहन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती भाविकांना केले आहे.