यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर

आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱयावर असणार आहेत. उत्तर प्रदेशातील उत्तर प्रदेशात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी योगी आदित्यनाथ बुधवारी दुपारी मुंबईत दाखल होणार आहेत.या दौऱ्या दरम्यान योगी आदित्यनाथ मुंबईतील उद्योजक आणि बॉलिवूडमधील दिग्गज व्यक्तींची ते भेट घेणार आहेत. तसेच ते सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी मंदिरातही दर्शनासाठी जाणार आहेत. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर मुख्यमंत्री […]

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर

आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱयावर असणार आहेत. उत्तर प्रदेशातील उत्तर प्रदेशात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी योगी आदित्यनाथ बुधवारी दुपारी मुंबईत दाखल होणार आहेत.या दौऱ्या दरम्यान योगी आदित्यनाथ मुंबईतील उद्योजक आणि बॉलिवूडमधील दिग्गज व्यक्तींची ते भेट घेणार आहेत.

तसेच ते सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी मंदिरातही दर्शनासाठी जाणार आहेत. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर मुख्यमंत्री शिंदेंची देखील भेट घेणार आहेत. महारष्ट्रातील उद्योग गुजरातला गेल्यानंतर आता योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशातील औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी मुंबईत येत असल्याने या दौऱ्याबद्दल राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, आमच्या मनात कोणाच्याही विषयी सूड भावना अथवा द्वेष नाही. या देशातील सर्वात मोठे उद्योजक मुंबईत राहतात, मुंबई हि देशाची आर्थिक राजधानी देखील आहे. कोणत्याही राज्याचा विकास हा संपूर्ण देशाचा विकास आहे. पण तिकडचं तिकडे पळून नेण्याला आमचा विरोध आहे. महाराष्ट्रातील गुंतवणूक कायम ठेवत तिकडे नवी गुंतवणूक करण्यास आमचा काहीच आक्षेप नाही. योगी आदित्यनाथ यांनी गुजरातमध्येही जावं. असे संजय राऊत म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number