महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आजापासून संपला सुरुवात केली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सध्या सुरू असल्याचा आरोप करून संपूर्ण महाराष्ट्रातील महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी संप पुकारला आहे. राज्यातील शहरी भागापासून गावखेड्यांपर्यत विज येते ती महावितरणाची. पण आता या महावितरणाचं खासगीकरणं करण्यात येणार आहे. महावितरणच्या अधिकाऱ्याकडून ३ दिवसाचा संप पुकारण्यात आला आहे. जर […]

महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आजापासून संपला सुरुवात केली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सध्या सुरू असल्याचा आरोप करून संपूर्ण महाराष्ट्रातील महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी संप पुकारला आहे. राज्यातील शहरी भागापासून गावखेड्यांपर्यत विज येते ती महावितरणाची. पण आता या महावितरणाचं खासगीकरणं करण्यात येणार आहे. महावितरणच्या अधिकाऱ्याकडून ३ दिवसाचा संप पुकारण्यात आला आहे. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर हा संप ३ दिवसानंतर देखील सुरु ठेवला जाणार आहे. महावितरणाच्या खासगीकरणास महावितरण कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.

या संपाचा परिणाम ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे.या संपामुळे त्यामुळं काही भागात वीज पुरवठा बंद झाल्यानं अडचणी निर्माण झाल्या आहेत. वीज पुरवठा बंद असल्याने अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतं आहे. दरम्यान, नागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक, चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे.तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे.

संपकरणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारची नोटीस मेस्मांतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान संपाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठक बोलावली आहे. तर या बैठकीत महावितरण बाबत काय निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number