संभाजीराजांना ‘धर्मवीर’ म्हंटले तरी वावगे नाही- शरद पवार

हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना ते धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केलं होत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या विरोधात राज्यभरात भाजप आक्रमक झालेली पाहायला मिळाली. भाजपचे नेते अजित पवार यांच्या विरोधात जोरदार टीका करत आहेत. त्यावर आता राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका […]

संभाजीराजांना ‘धर्मवीर’ म्हंटले तरी वावगे नाही- शरद पवार

हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना ते धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केलं होत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या विरोधात राज्यभरात भाजप आक्रमक झालेली पाहायला मिळाली. भाजपचे नेते अजित पवार यांच्या विरोधात जोरदार टीका करत आहेत. त्यावर आता राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शरद पवार म्हणाले, अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेलं विधान मी पाहिलं आहे. “धर्मवीर किंवा स्वराज्यरक्षक यावरुन वाद नको. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटले तरी अयोग्य नाही.” धर्मवीर, स्वराज्य रक्षक या दोन्ही उपाधी योग्य असं शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवारांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काहीजण जर छत्रपती संभाजी महाराजांना त्यांचे काम बघून त्यांना स्वराज्यरक्षक म्हणून उल्लेख करत असतील तर त्याला माझी काही हरकत नाही. जर धर्मवीर म्हणत असतील तर व ते फक्त धर्माच्या अँगलने पाहत असतील तर त्यांनाही माझी तक्रार नाही. कारण त्या व्यक्तीचे ते मत आहे आणि ते मांडण्याचा त्याला अधिकार आहे. असेही पवार म्हणाले. ज्यांना संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचे आहे त्यांनी धर्मवीर म्हंटले तरी हरकत नाही. व ज्यांना स्वराजरक्षक म्हणायचे त्यांनी म्हणावे असे शरद पवार म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number