राष्ट्रवादीकडून कायमच औरंगजेबाचे समर्थन केले जाते. त्यात आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ‘औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता’ या वक्तव्याची भर पडली आहे. आव्हाडांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे आव्हाड यांच्या विरोधात राजकीय नेत्यांच्या आक्रमक प्रतिक्रिया समोर येत आहेत.
आव्हाडांच्या विधानामुळे शिवप्रेमी आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. यापूर्वी औरंगाबाद येथे राष्ट्रवादीकडून औरंजेबाच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले होते. तर राष्ट्रवादीकडूनच यापूर्वी औरंगजेबाचा ‘सूफी संत’ म्हणून गौरव देखील करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आव्हाडांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा रान पेटले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी मागणी अशी मागणी करत आव्हाडांनी हिंदुस्थान सोडावा असं वक्तव्य शिवप्रेमी दिलीप पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे. तर जितेंद्र आव्हाड हे सोयीस्कररित्या इतिहास सांगत असल्याची टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे.