शिंदे गटातील ८ मंत्र्यांवर अतिरिक्त खात्यांची जबाबदारी

शिंदे-फडणवीस  सरकार स्थापन होऊन तब्बल ४० दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. १८ मंत्र्यांनीची मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमिवर शिंदे गटातील मंत्र्यांकडे वेगळ्या ८ खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. कोणत्या मंत्र्याकडे कोणते अतिरिक्त खाते उदय सामंत – माहिती आणि तंत्रज्ञान शंभूराज देसाई- परिवहन दादा भूसे- पणन संजय राठोड- सामाजिक न्याय […]

शिंदे गटातील ८ मंत्र्यांवर अतिरिक्त खात्यांची जबाबदारी

शिंदे-फडणवीस  सरकार स्थापन होऊन तब्बल ४० दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. १८ मंत्र्यांनीची मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमिवर शिंदे गटातील मंत्र्यांकडे वेगळ्या ८ खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोणत्या मंत्र्याकडे कोणते अतिरिक्त खाते

उदय सामंत – माहिती आणि तंत्रज्ञान

शंभूराज देसाई- परिवहन

दादा भूसे- पणन

संजय राठोड- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

तानाजी सावंत- मृद व जलसंधारण

अब्दुल सत्तार – आपत्ती व्यवस्थापन

दीपक केसरकर- पर्यावरण व वातावरणीय बदल

संदीपान भुमरे- अल्पसंख्याक व औकाफ

आजपासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर केवळ १८ मंत्र्यांचेच खातेवाटप करण्यात आलं आहे. बाकीची उर्वरीत खाती ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे राखून ठेवण्यात आली होती. मात्र, अधिवेशन काळात विरोधक या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करु शकते. त्यामुळे अधिवेशन सुरु होण्याअगोदरच शिंदे गटातील ८ मंत्र्यांकडे या अतिरिक्त खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राज्यातील राजकीय नाट्यांनतर शिवसेनेतील ४० आमदारांनी वेगळा गट स्थापन करत, भाजपसोबत सरकार स्थापन केले. यामुळे गेले काही दिवस राज्यातील राजकारण वातावरण तापले आहे. नव्या सरकारचे १८ कॅबिनेट मंत्री विरोधकांना कसे तोंड देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. दोन महिन्यापूर्वी सरकारमध्ये असलेली महाविकास आघाडी शिंदे सरकारला कशी आणि कोणत्या मुद्द्यावरुन घेरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number