‘शिंदे ठरवूनच मुख्यमंत्री’

मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून या वक्तव्याची दखल घेण्यात आली आणि पाटील यांचं भाषण सोशल मीडियावरुन काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आपल्यापैकीही अनेकांना […]

‘शिंदे ठरवूनच मुख्यमंत्री’

मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून या वक्तव्याची दखल घेण्यात आली आणि पाटील यांचं भाषण सोशल मीडियावरुन काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आपल्यापैकीही अनेकांना माहिती नव्हतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. पण हे अचानक घडलं नव्हतं तर सगळंकाही ठरवून होतं’, असं फडणवीस यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर आपले सगळ्यांचे नेते एकनाथ शिंदे हेच आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचे वेगळे अर्थ काढण्यात आले. माध्यमांचं ते कामंच आहे, असं फडणवीस यांनी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्यासाठी सत्ता हे साध्य नाही तर साधन आहे. सामाजिक आर्थिक प्रगतीचं उपकरण म्हणून आपण सत्तेकडे पाहतो. त्यामुळे हा गड जो आपण जिंकला आहे. पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या यात्रेत महाराष्ट्राला पुनर्वैभव प्राप्त करुन द्यायचं आहे. राज्यातील 12 कोटी जनतेची इच्छा होती की हे सरकार आलं पाहिजे. त्यांच्या मनातील संकल्पना आज आपण खऱ्या अर्थाने पूर्ण केली आहे. गेली अडीच वर्षे आपली संघर्षात गेली. ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या इतिहासात एक असं सरकार ज्यांनी अडीच वर्षे फक्त सूड उगवण्याचं काम केलं. एक अघोषित आणीबाणी राज्यात होती. आमच्याविरोधात बोलतात तर 10 – 12 पोलीस ठाण्यात फिरवू, जेलमध्ये टाकू, असं सगळं सुरु होतं. अनाचार, भ्रष्टाचार, अत्याचाराची परिसीमा गाठली होती. मात्र आज खुला श्वास घेऊन आपण ही बैठक घेत आहोत. फक्त आपणच नाही तर महाराष्ट्रातील जनतेनही मोकळा श्वास घेतला आहे, अशा शब्दात फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number