भाजपाच्या आक्षेपावर सुनावणी सुरु

राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतदान पुर्ण झालं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत प्रत्येक आमदाराचं मतदानाचं मतमूल्य महत्वाचं आहे. या निवडणुकीसाठी भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी आजारी असताना विधानभवनात येऊन मतदानाचा अधिकार बजावला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून विधानभवनात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आजच […]

भाजपाच्या आक्षेपावर सुनावणी सुरु

राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतदान पुर्ण झालं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत प्रत्येक आमदाराचं मतदानाचं मतमूल्य महत्वाचं आहे. या निवडणुकीसाठी भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी आजारी असताना विधानभवनात येऊन मतदानाचा अधिकार बजावला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून विधानभवनात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आजच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचे मतदान बाद करण्याची मागणी भाजपने केली आहे. ही दोन्ही मतं बाद केल्यास महाविकास आघाडी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपचे पोलिंग एजंट मतदानाच्या ठिकाणी बसले होते. दरम्यान, भाजपचे पोलिंग एजंट पराग अळवणी यांनी जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांची मत बाद करण्याची मागणी केली आहे. आमदारांनी मतदान केल्यानंतर आपल्या गटाने नेमून दिलेल्या प्रतिनिधीला आपली मतपत्रिका दाखवणे आवश्यक आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपली मतपत्रिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हातात दिली. तर यशोमती ठाकूर यांनीही आपली मतपत्रिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हातात दिली. त्यावर भाजपचे पोलिंग पराग अळवणी यांनी हरकत नोंदवत त्यांची दोन्ही मतं बाद करण्याची मागणी केली आहे. तर भाजप केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. केंद्रीय आयोगाकडून या आक्षेपावर सुनावणी सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number