पावसाळा तोंडावर, ठाण्यातील नालेसफाई अपूर्णच

गेले अनेक दिवस ठाणे महानगर पालिका नालेसफाई वरून चर्चेत आहे कारण पावसाळा तोंडावर आला असताना देखील नालेसफाई पूर्ण झाली नाही. मात्र नालेसफाईचे काम पूर्ण झाले नसताना देखील महापालिका आयुक्त मात्र नालेसफाई ९० टक्के पूर्ण झाल्याचे बिनधास्त सांगत आहेत. येत्या काही दिवसातच पावसाळा सुरुवात होईल पण जर नालेसफाई पूर्ण नाही झाली तर, नागरिकांना मोठ्या नुकसानाला सामोरे […]

पावसाळा तोंडावर, ठाण्यातील नालेसफाई अपूर्णच

गेले अनेक दिवस ठाणे महानगर पालिका नालेसफाई वरून चर्चेत आहे कारण पावसाळा तोंडावर आला असताना देखील नालेसफाई पूर्ण झाली नाही. मात्र नालेसफाईचे काम पूर्ण झाले नसताना देखील महापालिका आयुक्त मात्र नालेसफाई ९० टक्के पूर्ण झाल्याचे बिनधास्त सांगत आहेत. येत्या काही दिवसातच पावसाळा सुरुवात होईल पण जर नालेसफाई पूर्ण नाही झाली तर, नागरिकांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. अनेक ठिकाणी नाले भरल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये ४ ते ५ फूट पाणी जाते.

त्यामुळे, नालेसफाई करणे अत्यंत महत्वाचे असतना देखील महापालिका प्रशासन दिरंगाई करत असल्याचा आरोप भाजप माजी गटनेते मनोहर डुंबरे यांचा आरोप आहे. नालेसफाई नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरच नालेसफाई करावी अन्यथा यावर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे. पावसाळ्याच्या आधी जर नालेसफाई झाली नाही तर नागरिकांना पावसाळ्यात घरात राहणे कठीण होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number