राणा दाम्पत्याचे नागपुरात हनुमान चालिसा पठण

35 दिवसानंतर दिल्लीहून राणा दाम्पत्याचे आज नागपुरात आले. अमरावतीला जाण्यापूर्वी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी नागपुरातील रामनगरमधील मारुती मंदिरात हनुमान चालिसाचे पठण केले. त्याच मंदिरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा राणा दाम्पत्य येण्याआधीच हनुमान चालिसाचे पठण केले. तसेच, देशावरील महागाईचे संकट टळावे म्हणून मंदिरात हनुमानाची आरती देखील केली जाणार असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले होते. त्यामुळे […]

राणा दाम्पत्याचे नागपुरात हनुमान चालिसा पठण

35 दिवसानंतर दिल्लीहून राणा दाम्पत्याचे आज नागपुरात आले. अमरावतीला जाण्यापूर्वी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी नागपुरातील रामनगरमधील मारुती मंदिरात हनुमान चालिसाचे पठण केले. त्याच मंदिरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा राणा दाम्पत्य येण्याआधीच हनुमान चालिसाचे पठण केले. तसेच, देशावरील महागाईचे संकट टळावे म्हणून मंदिरात हनुमानाची आरती देखील केली जाणार असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले होते. त्यामुळे मंदिर परिसरातच राणा समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने येण्याची शक्यता होती.

दरम्यान, मंदिर परिसरात शांतता रहावी यासाठी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावल्या होत्या. हनुमान चालिसाचे पठन करताना लाऊडस्पीकरचा वापर करू नये, मंदिरासमोर गर्दी जमवू नये, वादग्रस्त वक्तव्य करू नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. राणा दाम्पत्य मंदिरात आले तेव्हा मंदिरासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी राष्ट्रवादी आणि राणा दाम्पत्याला वेगवेगळ्या वेळा दिल्याने संघर्ष टळला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेशवर पेठे यांच्या नेतृत्वाखाली राणा दाम्पत्य येण्यापूर्वीच हनुमान चालिसाचे पठण आणि आरती करण्यात आली. पोलिस बंदोबस्त तैनात असल्याने आक्रमक घटना घडली नाही.

नागपुरात हनुमान चालिसाचे पठण केल्यानंतर राणा दाम्पत्य अमरावतीकडे रवाना झाले. अमरावतीत भव्य मोर्चा काढून त्या मोर्चाचा समारोप हनुमान चालिसाच्या पठणाने करण्यात येईल, अशी माहिती नवनीत राणा यांनी दिली होती. तसेच, आम्हाला शांततेत हनुमान चालिसा म्हणता यावी, यासाठी नागपुरात पोलिसांनी केलेल्या बंदोबस्ताबद्दल राणा दाम्पत्याने नागपूर पोलिसांचे आभार मानले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number