राज ठाकरेंचा औरंगाबादेतून घणाघात

‘चार तारखेपासून ऐकणार नाही’ असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत दिला. ‘भोंगे हटले नाहीत तर हनुमान चालीसा लावाच. एकदा काय ते होऊनच जाऊ दे. आधी मशिदीचे भोंगे उतरतील मग मंदिराचे भोंगे उतरतील. असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.  सभेला आडकाठी कशाला केलीत ? असा सवाल त्यांनी केला. इतिहास विसरलात तर, भूगोल पायाखालून […]

राज ठाकरेंचा औरंगाबादेतून घणाघात

‘चार तारखेपासून ऐकणार नाही’ असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत दिला. ‘भोंगे हटले नाहीत तर हनुमान चालीसा लावाच. एकदा काय ते होऊनच जाऊ दे. आधी मशिदीचे भोंगे उतरतील मग मंदिराचे भोंगे उतरतील. असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. 

सभेला आडकाठी कशाला केलीत ? असा सवाल त्यांनी केला. इतिहास विसरलात तर, भूगोल पायाखालून जाईल, असं वक्तव्य त्यांनी केलं. खिलजीविरोधात गाफील राहिल्याने राज्य गेल्याचं राज म्हणाले. 

महाराष्ट्रात छत्रपतींच्या रूपाने स्वाभिमान जन्मला आला. औरंगजेब महाराष्ट्रातून परत जाऊ शकला नाही. असं सांगतानाच शिवाजी ही व्यक्ती नाही विचार आहे,  असं ते म्हणाले, 

महाराष्ट्र सध्या संकटात आहे. महाराष्ट्रात सर्रास शिवीगाळ सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं.

राज यांनी भोंगाविरोधाचे समर्थन केले आहे. भोंगा उतरवा नाहीतर हनुमान चालीसा पठण करूच. मुसलमानांमध्येही भोंग्याचे विरोधक आहेत असं त्यांनी सांगितलं.

‘उत्तर प्रदेशात भोंगा उतरतो तर महाराष्ट्रात का नाही?’ असा सवाल त्यांनी केला. सगळे भोंगे अनधिकृत असल्याचं ते म्हणाले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number