म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणी दोषारोपपत्र दाखल

म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणी ३५०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. म्हाडाच्या अंतर्गत गट अ, ब, क पदंची परीक्षेसाठी जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीचा संचालक डॉ. प्रितिश देशमुख याने एजंटच्या मदतीने परीक्षेपूर्वीच पेपर फुटला असल्याची खळबळ उडाली होती. त्यामुळे पुण […]

म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणी दोषारोपपत्र दाखल

म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणी ३५०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

म्हाडाच्या अंतर्गत गट अ, ब, क पदंची परीक्षेसाठी जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीचा संचालक डॉ. प्रितिश देशमुख याने एजंटच्या मदतीने परीक्षेपूर्वीच पेपर फुटला असल्याची खळबळ उडाली होती. त्यामुळे पुण सायबर पोलिसांनी तपास करत याप्रकरणी डॉ. प्रितिश देशमुख, एजंट अंकुश हरकळ, संतोष  हरकळ या तिघांविरोधात प्रथमवर्ग न्यायदहडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयात ३५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. तसेच याप्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

देशमुख आणि हरकळ बंधू यांच्यासह जमाल इब्राहिम पठाण, कलीम गुलशेर खान, दिपक विक्रम भुसारी या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. म्हाडाच्या वतीने, गट अ, ब, क या पदांचे परीक्षा घेण्याकरिता जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीसोबत करार केला हातो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number