पुण्यात चक्क झाडाचं डोहाळे जेवण!

महिलांचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आपण पाहिला असेल, ऐकलं असेल. पण एखाद्या झाडाचे डोहाळे पुरवल्याचं याआधी कधी ऐकलंय का? नाही ना… पण हे पुण्यात घडलंय. नारळाच्या झाडावर असलेल्या प्रेमापोटी एका महिलेने झाडाला तुरा आला म्हणून चक्क डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवला. एखाद्या महिलेच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असल्याच्या थाटात त्यांनी हा कार्यक्रम साजरा केला. नारळाच्या झाडाला साडी नेसवून […]

पुण्यात चक्क झाडाचं  डोहाळे जेवण!

महिलांचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आपण पाहिला असेल, ऐकलं असेल. पण एखाद्या झाडाचे डोहाळे पुरवल्याचं याआधी कधी ऐकलंय का? नाही ना… पण हे पुण्यात घडलंय. नारळाच्या झाडावर असलेल्या प्रेमापोटी एका महिलेने झाडाला तुरा आला म्हणून चक्क डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवला.

एखाद्या महिलेच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असल्याच्या थाटात त्यांनी हा कार्यक्रम साजरा केला.

नारळाच्या झाडाला साडी नेसवून एखाद्या गर्भार महिलेसारखा शृंगार केला.

डोहाळ गीत गात एखाद्या गर्भार बाईचं जसं ओटीभरण केलं जातं, अगदी तसंच ओटीभरण झाडाचंही करण्यात आलं.

पुण्याच्या कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या नीता यादवाड यांनी हा कार्यक्रम केला.

वृक्षप्रेमी असलेल्या नीता यादवाड यांच्या बंगल्याच्या आसपास अनेक वृक्ष आहेत. काही वर्षापूर्वी त्यांनी कोकण विद्यापीठातून नारळाचं झाड आणलं आणि बागेत लावलं. परंतु पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी ते झाड वाढेनासं झालं. त्यामुळे मग त्यांनी ते झाड तिथून काढले आणि इतर ठिकाणी लावलं. त्याला पाणी देऊन खत देऊन ते जिवंत राहील याची पूर्ण खबरदारी त्यांनी घेतली.

तीन आठवड्यापूर्वी त्याला तुरा आला. आपल्या झाडाला आता नारळ येणार या आनंदात त्यांनी डोहाळ जेवणाचा कार्यक्रम ठेवण्याचं निश्चित केले. त्यानंतर ओटीभरणासाठी मैत्रिणींना बोलावलं. झाडाला साडी नेसवून शृंगार केला. डोहाळे गीत गात एखाद्या गर्भार बाईचे जसे ओटीभरण होते, अगदी तसेच ओटीभरण नीता यांनी झाडाचं केलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number