Gold-Silver Price : नवरात्र संपताच सोन्याचे भाव घसरले; चांदीत तेजी कायम, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने-चांदीचा भाव

नवरात्री संपताच सोन्याच्या दरात घट झाली असून दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोने 1,18,000 रुपयांच्या आसपास विकले जात आहे.

Gold-Silver Price : नवरात्र संपताच सोन्याचे भाव घसरले; चांदीत तेजी कायम, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने-चांदीचा भाव

नवरात्री आणि दसऱ्याच्या सणानंतर सोन्याच्या दरांमध्ये अचानक घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या किंमतींना 3 ऑक्टोबर 2025 रोजी ब्रेक लागला. विशेष म्हणजे, दिल्लीसह मुंबई, चेन्नई, कोलकाता अशा प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे सोने खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत आता 1,18,190 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,08,350 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवली गेली आहे. 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये सोने 1,21,000 रुपयांच्या पुढे गेले होते. त्यामानाने फक्त दोन दिवसांत सोन्याच्या दरात लक्षणीय घट झाली आहे.

मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथेही सोन्याचे दर जवळपास सारखेच राहिले आहेत. या शहरांत 24 कॅरेट सोने 1,18,000 ते 1,18,200 रुपये दरम्यान तर 22 कॅरेट सोने 1,08,000 ते 1,08,400 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. बेंगळुरू, हैदराबाद, केरळ, वडोदरा आणि अहमदाबाद येथेही याच स्तरावर दर कायम आहेत.

हेही वाचा : Petrol Diesel Price : वाहनधारकांसाठी खुशखबर! पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

सोन्याच्या भावात घट दिसली असली तरी चांदीने मात्र स्थिर वाढ कायम ठेवली आहे. 3 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये चांदीचा भाव 1,53,100 रुपये प्रति किलो झाला. 1 ऑक्टोबर रोजी हा भाव 1,50,500 रुपये प्रति किलो होता. म्हणजेच अवघ्या दोन दिवसांत चांदीत 3,000 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली असून त्याची मागणी अजूनही मजबूत असल्याचे दिसते.

विशेषज्ञांच्या मते, भारतातील सोने-चांदीचे दर प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींवर अवलंबून असतात. अमेरिकन डॉलरची चढ-उतार, कच्च्या तेलाच्या किंमती, जागतिक आर्थिक स्थिती तसेच अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे व्याजदर यांचा थेट परिणाम या मौल्यवान धातूंवर होतो. शिवाय, सणासुदीचा काळ आणि लग्नसराईच्या हंगामामुळे देशांतर्गत मागणीत वाढ होते, ज्यामुळे दरांमध्ये वारंवार चढ-उतार होताना दिसतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number