महाराष्ट्र लोकसेवा आयोगने स्पर्धा परीक्षांच्या प्रणालीत मोठे बदल जाहीर केले आहेत. 2027 पासून राज्य सेवा, गट-ब आणि गट-क पूर्व परीक्षा CBT पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तसेच या परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याची आणि Normalization पद्धती लागू करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
CBT म्हणजे काय?
CBT (Computer Based Test) म्हणजे संगणकावर घेतली जाणारी परीक्षा. उमेदवारांना प्रश्न संगणकाच्या स्क्रीनवर दिसतात आणि उत्तरही संगणकावरच नोंदवावे लागते. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि मूल्यमापन या सर्व प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होतात.
CBT पद्धतीचे फायदे
निकाल अधिक जलद लागतो. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता आणि सुरक्षितता वाढते. मानवी चुका कमी होतात. अनेक सत्रांमध्ये परीक्षा घेणे शक्य होते. डिजिटल मूल्यमापनामुळे पारदर्शकता वाढते.
CBT पद्धतीबाबत काही विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील संगणक सुविधांचा अभाव, डिजिटल कौशल्यातील तफावत आणि Normalization प्रणालीबाबत चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार विद्यार्थ्यांशी चर्चा करूनच निर्णयांची अंमलबजावणी करेल, असे स्पष्ट केले आहे.
नवीन बदल काय आहेत?
2027 पासून राज्य सेवा, गट-ब आणि गट-क पूर्व परीक्षा CBT स्वरूपात होतील. पूर्व परीक्षा वर्षातून दोनदा होतील.
विविध सत्रांतील गुणांची समानता राखण्यासाठी Normalization प्रणाली करण्यात येणार आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्रता Normalized Score वर आधारित.