Paytm Job Recruitment: फिनटेक क्षेत्रातील मोठी घडामोड; मार्च 2027 पर्यंत Paytm करणार 4,000 कर्मचाऱ्यांची बंपर भरती

कंपनीच्या वतीने आपले व्यापारी नेटवर्क (Merchant Network) अधिक मजबूत करण्यासाठी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अत्याधुनिक उत्पादनांचा विस्तार करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.

Paytm Job Recruitment: फिनटेक क्षेत्रातील मोठी घडामोड; मार्च 2027 पर्यंत Paytm करणार 4,000 कर्मचाऱ्यांची बंपर भरती

Paytm Job Recruitment: भारतीय डिजिटल पेमेंट क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'Paytm' आगामी 9 महिन्यांत सुमारे 4,000 नवीन कर्मचाऱ्यांची मेगाभरती करणार आहे. कंपनीच्या वतीने आपले व्यापारी नेटवर्क (Merchant Network) अधिक मजबूत करण्यासाठी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अत्याधुनिक उत्पादनांचा विस्तार करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. या मोठ्या भरती मोहिमेमुळे पेटीएमच्या एकूण कर्मचारी संख्येत थेट 10 टक्क्यांची वाढ होणार आहे. सध्या कंपनीकडे जवळपास 40,000 कर्मचारी कार्यरत आहेत. नियामकांच्या कठोर कारवाईनंतर पेटीएम मोठ्या व्यावसायिक पुनर्रचनेच्या टप्प्यातून जात आहे. या अंतर्गत, कंपनीने तंत्रज्ञान आणि बदलत्या बाजारपेठेनुसार स्वतःला तयार करण्यास सुरुवात केली आहे.

कामगिरीच्या मूल्यमापनानंतर घेतला निर्णय
एकीकडे नवी भरती सुरू असतानाच, दुसरीकडे चालू कामगिरी मूल्यमापन प्रक्रियेनंतर (Performance Appraisal Cycle) पेटीएम आपल्या एकूण कर्मचारी वर्गातील 1 टक्के म्हणजेच जवळपास 400 जणांना कामावरून कमी करत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) निर्बंधांनंतर 'Paytm पेमेंट्स बँक'च्या कामकाजावर मोठा परिणाम झाला होता, ज्यामुळे समूहाला यापूर्वी 4,500 हून अधिक नोकऱ्या कपातीचा निर्णय घ्यावा लागला होता. आता बँकेची कामकाज बंद करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने उर्वरित काहीशे कर्मचाऱ्यांनाही कमी केले जाणार आहे. मात्र, त्यातील पात्र कर्मचाऱ्यांना समूहातील इतर विभागांमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.

गेल्या 2 महिन्यांत 800 हून अधिक जणांना रोजगार
पेटीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विजय शेखर शर्मा यांचे मुख्य उद्दिष्ट कंपनीच्या कोट्यवधी नोंदणीकृत युजर्सना कर्ज, गुंतवणूक आणि इतर वित्तीय सेवांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे आहे. यासाठी वरिष्ठ नेतृत्व पदांसह उत्पादन (Product), तंत्रज्ञान आणि AI यांसारख्या प्रमुख विभागांसाठी मार्च 2027 पर्यंत ही भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू राहील. कंपनीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, त्यांनी गेल्या अवघ्या 2 महिन्यांत 800 हून अधिक लोकांना नोकरीवर घेतले असून, उर्वरित 4,000 जणांच्या नियुक्तीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

हेही वाचा – H-1B Visa: डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका; अमेरिकन न्यायालयाकडून H-1B व्हिसाचे 1,00,000 शुल्क रद्द

सलग चार तिमाहीत नफा; आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल
 2010 मध्ये केवळ एक मोबाईल रिचार्ज प्लॅटफॉर्म म्हणून सुरू झालेल्या पेटीएमने नंतरच्या काळात डिजिटल पेमेंट आणि बँकिंग क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली. विविध कायदेशीर आव्हानांना तोंड दिल्यानंतर कंपनीने आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे पेटीएमने सलग 4 तिमाहीत नफा (Profit) नोंदवला आहे. सन 2021 मध्ये शेअर बाजारात सूचिबद्ध झालेल्या या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या 1 वर्षात सुमारे 7 टक्क्यांची वाढ झाली असली, तरी हे शेअर्स त्यांच्या मूळ आयपीओ (IPO) किमतीपेक्षा अजूनही 50 टक्क्यांहून अधिक खाली व्यवहार करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number