Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात मोठी कलाटणी; 10 ग्रॅमच्या नव्या किंमतीत मोठा ट्विस्ट

मध्यपूर्वेतील युद्ध आणि अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे भारतातील सोन्याच्या भावात किंचित बदल दिसून आला आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात मोठी कलाटणी; 10 ग्रॅमच्या नव्या किंमतीत मोठा ट्विस्ट

Todays Gold-Silver Price: मध्यपूर्वेतील युद्ध आणि अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. हे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, चलन विनिमय दर आणि स्थानिक करांनुसार (जीएसटी) बदलू शकतात. भारतीय बाजारात सोन्याच्या घरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज सोन्याचे दर जाणून घ्या… आज 16 फेब्रुवारी 2026 रोजी देशात प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर अंदाजे 16,288 ते 17,056 दरम्यान आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव अंदाजे 14,930 ते 15,630 प्रति ग्रॅमच्या आसपास आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम अंदाजे 1,60,000 ते 1,70,000 च्या दरम्यान आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम साधारणपणे 1,49,000  1,55,000 च्या आसपास आहे. तर भारतातील चांदीचे दर प्रति किलो अंदाजे 2,62,000 ते 2,85,000 च्या दरम्यान आहेत. प्रति ग्रॅम दर सुमारे 262 ते 285 आहे, तसेच मुंबई आणि दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये दर जवळपास याच पातळीवर आहेत. 

हेही वाचा- Donald Trump: ट्रम्प यांनी माणुसकी दाखवली! भारतावर असणारे रशियन कच्च्या तेलावरील निर्बंध अमेरिकेने कमी केले
जाणून घ्या शहरानुसार सोन्याचे दर कसे आहेत? 
स्थानिक कर आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसमुळे मुंबई, पुणे, जळगाव शहरांनुसार किमतीत अल्प फरक असू शकतो.  मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,48,130 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,61,433 आहे. त्याचसोबत पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 1,49,300 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,62,880, 22 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,81,560 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा दर 1,90,644 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,48,130 रुपये आहे, तसेच 24 कॅरेट सोन्याचा दर 1,73,080, 22 रुपये आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये स्थानिक कर, जागतिक अनिश्चितता आणि मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने तेजी दिसून येत आहे. 

हेही वाचा- Pune Traffic Changes: पुण्यात आज वाहतुकीत महत्त्वाचे बदल! ‘या’ रस्त्यांवरील वाहतूक वळवली; पाहा पर्यायी रस्ते कोणते?
तज्ञांच्या मते, इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे जागतिक पातळीवर गुंतवणूकदार सावध झाले आहेत. ज्यामुळे भारतातील सोन्याच्या भावात किंचित बदल दिसून आला आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि भारतीय रुपयाच्या मूल्यातील बदलांमुळे चांदीच्या भावात चढ-उतार होत आहेत. शेअर बाजारातील चढउतार आणि चलनवाढीची भीती यामुळे लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. अशा वेळी सोने हे नेहमीच विश्वासार्ह पर्याय मानले जाते. त्यामुळे मागणी वाढल्याने दरही झपाट्याने वाढत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number