Gold Price Forecast: सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार सोनं! पुढील 4-5 वर्षांत 1 ग्रॅमसाठी 30 हजार मोजावे लागणार? तज्ज्ञांचा मोठा इशारा

सोनं म्हणजे भारतीय कुटुंबांसाठी केवळ दागिना नाही, तर सुरक्षित गुंतवणूक आणि गरजेच्या वेळी आधार मानलं जातं.

Gold Price Forecast: सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार सोनं! पुढील 4-5 वर्षांत 1 ग्रॅमसाठी 30 हजार मोजावे लागणार? तज्ज्ञांचा मोठा इशारा

Gold Price Forecast: सोनं म्हणजे भारतीय कुटुंबांसाठी केवळ दागिना नाही, तर सुरक्षित गुंतवणूक आणि गरजेच्या वेळी आधार मानलं जातं. मात्र येत्या काही वर्षांत हेच सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ, वित्तीय संस्था आणि जागतिक बाजारातील सध्याचा कल पाहता २०३० पर्यंत सोन्याच्या किमती आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचू शकतात.

सध्या सुरू असलेली महागाई, जागतिक राजकीय अस्थिरता आणि आर्थिक अनिश्चितता यांचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर होत आहे. तज्ज्ञांच्या मते, जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर पुढील पाच वर्षांत सोन्याचे दर दुप्पट होण्याची दाट शक्यता आहे. काही अंदाजानुसार २०३० पर्यंत १ ग्रॅम सोन्याची किंमत तब्बल ३० हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते. म्हणजेच १० ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना जवळपास ३ लाख रुपये मोजावे लागू शकतात.

सोन्याकडे गुंतवणूकदारांचा वाढता कल यामागचं महत्त्वाचं कारण आहे. रुपया किंवा डॉलर यांसारख्या कागदी चलनाचं मूल्य काळानुसार महागाईमुळे कमी होतं, मात्र सोनं आपली किंमत टिकवून ठेवतं. त्यामुळेच आर्थिक संकटाच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. युद्ध, मंदी किंवा शेअर बाजारातील घसरण अशा परिस्थितीत सोन्याच्या किमती झपाट्याने वाढतात, असा अनुभव वारंवार आला आहे.

याशिवाय, अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहेत. भारत, चीन आणि रशिया यांसारखे देश डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सोन्याचा साठा वाढवत आहेत. यामुळे जागतिक बाजारात उपलब्ध सोन्याचा पुरवठा कमी होत असून मागणी मात्र वाढत आहे. हा असमतोल दरवाढीला अधिक गती देत आहे.

सोन्याच्या उत्खननाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन खाणींचा शोध कमी लागतोय, उत्खननाचा खर्च वाढतोय आणि नैसर्गिक साठे मर्यादित होत चालले आहेत. पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने सोन्याच्या किमती वाढणं अपरिहार्य मानलं जात आहे.

जागतिक पातळीवर सुरू असलेले युद्धसदृश तणाव, विशेषतः युरोप आणि मध्य-पूर्वेतील परिस्थिती, यामुळे गुंतवणूकदार अधिक सुरक्षित पर्याय शोधत आहेत. अशा वेळी सोनं ‘सेफ हेवन’ म्हणून पुढे येतं. यासोबतच जागतिक व्यापारात डॉलरचं वर्चस्व कमी करण्याचे प्रयत्नही सोन्याच्या मागणीत भर घालत आहेत.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, भविष्यात लग्नकार्य, मोठे समारंभ किंवा दीर्घकालीन गुंतवणूक यासाठी सोने खरेदी करण्याचा विचार असेल, तर आताच नियोजन करणं अधिक शहाणपणाचं ठरू शकतं. अन्यथा २०३० पर्यंत सोने केवळ अतिश्रीमंतांसाठीच परवडणारी मालमत्ता बनेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number