Viral Chat: ‘माझी मानसिक अवस्था ठीक नाही…’ एवढं सांगितलं आणि नोकरीच गेली? व्हायरल चॅटची जोरदार चर्चा

मानसिक अस्वस्थतेमुळे एका कर्मचाऱ्याने एक दिवसाची रजा मागितली.

Viral Chat: ‘माझी मानसिक अवस्था ठीक नाही…’ एवढं सांगितलं आणि नोकरीच गेली? व्हायरल चॅटची जोरदार चर्चा

आजच्या धावपळीच्या आयुष्यात मानसिक आरोग्य हा महत्त्वाचा विषय बनला असला, तरी अनेक कार्यस्थळांवर त्याकडे अजूनही गांभीर्याने पाहिले जात नसल्याची चर्चा वारंवार होत असते. अशातच एका कर्मचाऱ्याने मानसिक अस्वस्थतेमुळे एक दिवसाची रजा मागितल्यानंतर घडलेल्या घटनाक्रमाने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. बॉस आणि कर्मचाऱ्यामधील व्हॉट्सअॅप संभाषण सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचाऱ्याने सकाळी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संदेश पाठवत मानसिकदृष्ट्या स्वतःची अवस्था ठीक नसल्याचे सांगितले. त्याने आज कामावर येणे शक्य नसल्याचे नमूद करत एक दिवसाची रजा मंजूर करण्याची विनंती केली. मात्र, हे कारण वरिष्ठांना मान्य झाले नाही.

बॉसनं त्या कर्मचाऱ्याला मानसिक अस्वस्थता हे रजेचं योग्य कारण नसल्याचे सांगत तातडीने कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले. या उत्तरानंतर कर्मचारी नाराज झाला. त्याने पुन्हा संदेश पाठवत आपल्या अडचणी प्रामाणिकपणे सांगितल्याबद्दल माफी मागितली आणि त्याच वेळी नोकरीचा राजीनामाही जाहीर केला.

qq

कर्मचाऱ्याने स्पष्ट शब्दांत, "आजच माझा कार्यालयातील शेवटचा दिवस समजा," असे सांगितले. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला फुल अँड फायनल सेटलमेंटवर परिणाम होईल, तसेच विनापरवानगी नोकरी सोडल्याची नोंद केली जाईल, असा इशारा दिल्याचे चॅटमध्ये दिसते.

मात्र, कर्मचाऱ्यानेही ठाम भूमिका घेत अनुभव प्रमाणपत्राची गरज नसल्याचे सांगितले. ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा आणि भावनांचा आदर केला जात नाही, अशा ठिकाणी काम करण्याची इच्छा नसल्याचे त्याने उत्तरात नमूद केले.

व्हॉट्सअॅप चॅटमध्ये दोघांमध्ये नंतर अल्प कालावधीचा व्हॉइस कॉल झाल्याचेही दिसून येते. मात्र, त्या संभाषणात नेमकी काय चर्चा झाली, याची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

हे संपूर्ण संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कार्यस्थळावरील वातावरण, मानसिक आरोग्य आणि कर्मचाऱ्यांशी होणाऱ्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींनी मानसिक आरोग्याला अधिक महत्त्व देण्याची गरज व्यक्त केली, तर काहींनी या व्हायरल चॅटच्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान, हे संभाषण खरे की बनावट याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला किती महत्त्व दिले जाते, यावर पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number