Ritabrata Banerjee TMC : ममतांचा पक्ष फोडला, पश्चिम बंगालमध्ये ‘शिंदे पॅटर्न’ राबवणारे ऋतब्रत बॅनर्जी कोण?

पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ज्यांनी ममतांचा पक्ष फोडला आणि बंगालमध्ये शिंदे पॅटर्न राबवणारे ऋतब्रत बॅनर्जी कोण आहेत? ते जाणून घ्या...

Ritabrata Banerjee TMC : ममतांचा पक्ष फोडला, पश्चिम बंगालमध्ये ‘शिंदे पॅटर्न’ राबवणारे ऋतब्रत बॅनर्जी कोण?

पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रात ज्या प्रकारे पक्षफुटीचे राजकारण पाहायला मिळाले, तशाच प्रकारचा घटनाक्रम आता बंगालमध्ये घडत असल्याची चर्चा सुरू आहे. पश्चिम बंगालच्या राजकारणात सत्ता गमावल्यानंतर आधीच बॅकफूटवर गेलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाला आता अंतर्गत बंडखोरीचा मोठा फटका बसला आहे. पक्षातील 80 आमदारांपैकी तब्बल 59 आमदारांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तृणमूल काँग्रेसमधील काही असंतुष्ट आमदारांनी एकत्र येत स्वतंत्र गट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या गटाचे नेतृत्व पक्षातून हकालपट्टी झालेले नेते ऋतब्रता बॅनर्जी आणि संदीपान साहा करत असल्याचे समोर आले आहे. या बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना एक महत्त्वाचे पत्र सादर केले असून, त्यात गटनेतृत्व बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.

या पत्रावर अनेक आमदारांच्या स्वाक्षऱ्या असल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे.या घडामोडींमुळे बंगालच्या राजकारणात 'महाराष्ट्र पॅटर्न' पुन्हा एकदा चर्चेत आला असून, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फाटाफुटीची आठवण राजकीय विश्लेषकांना झाली आहे. दरम्यान ज्यांनी ममतांचा पक्ष फोडला आणि बंगालमध्ये शिंदे पॅटर्न राबवणारे ऋतब्रत बॅनर्जी कोण आहेत? ते जाणून घ्या…

हेही वाचा- Thane MLC Election : शेवटच्या क्षणी ठाण्यात नाट्यमय घडामोड! ठाणे विधानपरिषदेत रविंद्र फाटक यांचा मार्ग मोकळा
 
ऋतब्रता बॅनर्जी कोण आहेत?
ऋतब्रता बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष फोडत तब्बल 59 आमदार गळाला लावले आहेत. तसेच ऋतब्रता बॅनर्जी यांच्या गटाला विधानसभेतही मान्यता मिळाली आहे. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष फोडणारे ऋतब्रता बॅनर्जी यानी विद्यार्थी राजकीय कारकिर्दीची सुरुवात डाव्या विचारसरणीच्या एसएफआय संघटनेने केली. 2014 मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले होते.

तसेच पश्चिम बंगालमधील उलुबेरिया पूर्वा विधानसभेचे आमदार ऋतब्रता बॅनर्जी हे 2020 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात सामील झाले. यावेळी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभेचे खासदार होते. तर 2024 मध्ये ते दुसऱ्यांदा राज्यसभेचे खासदार झाले. त्याचसोबत 2026 च्या विधानसभा निवडणुकीत ते उलुबेरिया पूर्वा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले असून आमदार झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number