Sea Plane Trial: उत्तराखंडच्या पर्यटनाला मिळणार गती; पशूलोक बॅरेजवर सी-प्लेनचे पाण्यात यशस्वी लँडिंग, पाहा व्हिडीओ

सी-प्लेन सेवा सुरू झाल्यामुळे उत्तराखंडच्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील प्रवासाचे चित्र बदलणार आहे.

Sea Plane Trial: उत्तराखंडच्या पर्यटनाला मिळणार गती; पशूलोक बॅरेजवर सी-प्लेनचे पाण्यात यशस्वी लँडिंग, पाहा व्हिडीओ

Sea Plane Trial: उत्तराखंडमधील पर्यटन आणि वाहतूक क्षेत्रात आज एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळाला. ‘UJVN लिमिटेड’च्या वतीने पशूलोक बॅरेज येथे सी-प्लेनच्या (जलविमानाची) यशस्वी चाचणी घेण्यात आली. राज्यामध्ये सी-प्लेन सेवा सुरू करण्याच्या दिशेने हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून, यामुळे देवभूमीच्या पर्यटनाला आता नवी भरारी मिळणार आहे.

दुर्गम भागातील प्रवास होणार सुसह्य
सी-प्लेन सेवा सुरू झाल्यामुळे उत्तराखंडच्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील प्रवासाचे चित्र बदलणार आहे. सध्या ज्या ठिकाणी रस्तेमार्गे पोहोचणे कठीण आहे किंवा जिथे पारंपारिक विमानतळ नाहीत, अशा जलाशयांच्या ठिकाणी पर्यटकांना थेट उतरता येईल. यामुळे केवळ पर्यटन स्थळांची लोकप्रियता वाढणार नाही, तर स्थानिक स्तरावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधीही निर्माण होतील.

‘हाय-एंड’ पर्यटनासह आपत्ती काळातही मदत
तज्ञांच्या मते, या सेवेमुळे राज्यातील ‘उच्च-स्तरीय पर्यटनाला’ (High-end tourism) मोठी चालना मिळेल. देश-परदेशातील पर्यटकांसाठी उत्तराखंडचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आकर्षक ठरेल. पर्यटनाव्यतिरिक्त, डोंगररांगांमध्ये अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदत आणि बचाव कार्ये वेगाने राबवण्यासाठी या जलविमानांचा मोठा उपयोग होऊ शकतो, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Monsoon 2026 Prediction: बळीराजाचं टेन्शन वाढलं! मान्सूनवर ‘एल निनो’चं गडद सावट; यंदा पाऊस सरासरीपेक्षा…

जागतिक पर्यटन नकाशावर नवी ओळख
राज्य सरकार या प्रकल्पाकडे आधुनिक वाहतूक पायाभूत सुविधांच्या विस्ताराचा एक भाग म्हणून पाहत आहे. पशूलोक बॅरेजवरील ही चाचणी यशस्वी ठरल्याने, आगामी काळात राज्यातील विविध नद्या आणि मोठ्या जलाशयांवर सी-प्लेन सेवांचा विस्तार केला जाणार आहे. यामुळे जागतिक पर्यटन नकाशावर उत्तराखंडची एक आधुनिक आणि वेगळी ओळख निर्माण होण्यास मदत होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number