Delhi Bomb Threat : राजधानी अजूनही दहशतीत; दोन शाळा, चार न्यायालयं बॉम्बने उडवण्याची धमकी, ‘जैश-ए-मोहम्मद’च्या अकाऊंटवरून मेल

दिल्लीतील लाल किल्लाजवळ झालेल्या कार ब्लास्टनंतर राजधानी दिल्लीसह देशभरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. लाल किल्लाजवळील कार ब्लास्ट ताजा असताना, अशातच आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Delhi Bomb Threat : राजधानी अजूनही दहशतीत; दोन शाळा, चार न्यायालयं बॉम्बने उडवण्याची धमकी, ‘जैश-ए-मोहम्मद’च्या अकाऊंटवरून मेल

दिल्लीतील लाल किल्लाजवळ झालेल्या कार ब्लास्टनंतर राजधानी दिल्लीसह देशभरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. लाल किल्लाजवळील कार ब्लास्ट ताजा असताना, अशातच आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दिल्लीतील चार न्यायालयांसोबत दोन सीआरपीएफ शाळांनाही बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत भितीचे वारे वाहत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार जैश-ए-मोहम्मदच्या नावाने पोलिसांना मेल पाठवण्यात आला. यात असं सांगण्यात आलं होत की, दिल्लीतील साकेत न्यायालय, पटियाला हाउस, तीस हजारी आणि रोहिणी न्यायालयांमध्ये मोठा स्फोट होऊ शकतो. तसेच यामध्ये द्वारका आणि प्रशांत विहार येथील शाळांचा समावेश आहे. दिल्लीतील लाल किल्लाजवळील कार ब्लास्टनंतर दिल्लीतील सुरक्षा यंत्रणांकडून ही धमकी आणखी गंभीर मानली जात आहे.

अशा कोणत्याही धमकीला हलक्यात घेतलं नसून सध्या पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे. विशेष म्हणजेच धमकीमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे ज्या पटियाला हाउस कोर्टला बॉम्बस्फोटाची धमकी पाठवली गेली आहे, तिथे आज दिल्ली स्फोटातील आरोपीला हजर केले जाणार आहे. त्यामुळे पोलिसांकडून कोणताही हलगर्जीपणा होऊ नये याची पुर्ण खबरदारी घेण्यात आली आहे.

देशाची राजधानी असलेली दिल्ली 10 नोव्हेंबर रोजी हादरली. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार ब्लास्टमध्ये 13 ते 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली एवढचं नव्हे तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. बॉम्बमध्ये अमोनियम नायट्रेट नावाचा उच्च-तीव्रतेचा स्फोटक होता. या घटनेनंतर या स्फोटासंदर्भात अनेक खुलासे होत असलेले समोर येत आहेत. एवढचं नव्हे तर या प्रकरणाला वेगवेगळे वळण देखील लागत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number