Israel-Iran War Affect India: मध्यपूर्वेतील युद्धाची धग भारतात! हॉटेल्ससह आता लघुउद्योगांनाही फटका; साडे सात हजार कंपन्या संकटात

अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचे परिणाम आता भारतावर दिसू लागले आहेत.

Israel-Iran War Affect India: मध्यपूर्वेतील युद्धाची धग भारतात! हॉटेल्ससह आता लघुउद्योगांनाही फटका; साडे सात हजार कंपन्या संकटात

गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम भारतातील लघुउद्योग कंपन्यांवर झाला आहे. इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमिवर भारतासह इतर देशातील गॅस एजन्सींनी व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा थांबवला आहे. यादरम्यान पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात गॅस एजन्सींनी व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा थांबवला आहे. इराण-इस्रायल संघर्षाची धग आता देशातील गॅस शेगड्यांना बसू लागली असून, एलपीजी (LPG) पुरवठ्याचे जागतिक गणित पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत केलेल्या नाकेबंदीमुळे मध्यपूर्वेतून येणाऱ्या गॅस टँकर्सची सागरी वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडमधील पंधरा हजारांपैकी साडे सात हजार कंपन्यांमधील गॅसचा साठा संपुष्टात येत असल्यामुळे लघुउद्योगांनाही झळ लागली आहे. यावेळी पिंपरी चिंचवडमध्ये भोसरीतील श्री इंजिनिअर्स कंपनीतील व्यावसायिक गॅस संपल्यानं प्लाजमा मशीनचा पर्याय अवलंबला आहे. आजची परिस्थिती पाहता साडे सात हजार कंपन्याधील व्यावसायिक गॅस संपुष्टात आल्यावर नुकसानीचा आकडा कोट्यवधीत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा- Mumbai Hotel Closed News : मोठी बातमी! आखाती युद्धाचा मोठा परिणाम; मुंबईतील हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर, घरातही अन्न शिजवणं होणार कठीण
घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल
अशातच घरगुती गॅस सिलिंडरच्या दुसऱ्या गॅस बुकींगच्या कालावधीत मोठा बदल करण्यात आला आहे. एक घरगुती गॅस घरात असताना देखील दुसरा गॅस बुक करण्यासाठी नागरिकांना परवानगी असते. हा सिलिंडर 15 दिवसांच्या कालावधीत बुक करता येतो. मात्र सध्या सुरु असलेल्या इराणविरोधात अमेरिका, इस्रायल यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आता पहिला सिलिंडर बुक केल्यानंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी 25 दिवसांचा कालावधीत ठेवण्यात आला आहे. मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमिवर LPG, PNG, CNG, क्रूड ऑइलचा साठा मर्यादीत असल्याने या सगळ्याच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने गॅस वितरक कंपन्यांना लेखी आदेश देत व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडर महिनाभरातून एकच देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. 

हेही वाचा- Iran US Conflict 2026: इराणच्या तेल संपत्तीवर अमेरिकेचा डोळा! देशाचे तुकडे करण्याचा कट; तेहरानकडून युद्धाचा इशारा
युद्धामुळे मुंबईसह बेंगळुरूमधील हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय
आजपासून मुंबई आणि बेंगळुरूमधील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद राहतील. काम करणाऱ्या लोकांवर आणि घराबाहेर राहणाऱ्या आणि जेवणासाठी हॉटेल किंवा रेस्टॉरंटवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांवर होईल. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये 11 दिवसांपासून भयंकर युद्ध सुरूच आहे. युद्धात तेहरानसह अनेक इराणी शहरे उद्ध्वस्त झाली असून या युद्धात आतापर्यंत 1332 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहे. अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामुळे 12 हजार इराणी नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान, अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचे परिणाम आता भारतावर दिसू लागले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number