‘अमरावती बंदचा निर्णय नैराश्यातून घेतला’ – शरद पवार

  समाजातील शांततेला धक्का बसण्यासाठी नैराश्यातून बंदचा निर्णय घेतला असून हा प्रकार दुर्दैवी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर केला आहे.   नाशिक दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी बंदचा निर्णय नैराश्यातून घेतला असल्याचा आरोप भाजपवर केला आहे. ते म्हणाले, ‘त्रिपुरा हिंसाचार प्रकरण घडले म्हणून त्यांचे पडसाद महाराष्ट्रात उमटणे योग्य नाही. राज्यातील काही मोजक्याच […]

‘अमरावती बंदचा निर्णय नैराश्यातून घेतला’ – शरद पवार

  समाजातील शांततेला धक्का बसण्यासाठी नैराश्यातून बंदचा निर्णय घेतला असून हा प्रकार दुर्दैवी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर केला आहे.

  नाशिक दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी बंदचा निर्णय नैराश्यातून घेतला असल्याचा आरोप भाजपवर केला आहे. ते म्हणाले, ‘त्रिपुरा हिंसाचार प्रकरण घडले म्हणून त्यांचे पडसाद महाराष्ट्रात उमटणे योग्य नाही. राज्यातील काही मोजक्याच भागात या घटना घडल्या असून या प्रवृत्तींना किती महत्त्व द्यायचे हे लोकांनीच ठरवावे’, असे शरद पवार म्हणाले. तसेच ते म्हणाले, स्वत: नक्षली भागाचा दौरा करणार असून तेथील अडचण समजून घेणार आहे. देशाचे मूळ मालक  असणारे आदिवासी संस्था आजही बिकट आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी या ठिकाणी भव्यदिव्य आंतराष्ट्रीय स्मारक उभे करायचे आहे, असे ते म्हणाले.

  तसेच आदिवासींवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना नक्षली ठरवणे चुकीचे आहे. आदिवासी कधीही नक्षली असू शकत नाही, असे ते म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number