दाक्षिणात्य सुपरस्टार थालापती विजय याची हवा केवळ सिनेसृष्टी पुरतीच मर्यादीत नसून आता राजकारणात देखील पसरलेली पाहायला मिळत आहे. राजकारणात प्रवेश करताच विजयच्या प्रत्येक शक्तीप्रदर्शानात त्याचे चाहते तुफान गर्दी करताना पाहायला मिळतात. थआलापती विजयने 'तमिळगा वेट्री कझगम' या आपल्या राजकीय पक्षाची स्थापना केल्यानंतर आता विजयने विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकांकरिता विजयने निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. दरम्यान त्याने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून एक महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे. यावेळी विजयची एकूण संपत्ती किती हे पाहायला मिळाले आहे.
हेही वाचा- Ashwini Bhide : मुंबई महापालिकेची धुरा महिलांच्या हाती! महापौरनंतर आता आयुक्त पदावरही महिला?
विजयने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, विजयकडे सुमारे 404.58 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. विशेष म्हणजे, शालिग्रामम इथे एका बँकेच्या शाखेत त्याच्या बचत खात्यात तब्बल 213.36 कोटी रुपये जमा आहेत. ज्यामध्ये 45 कोटी, 30 कोटी, 10 कोटी अशा मालमत्तांचा समावेश आहे. तसेच सोन्याचा साठा 4,000 ग्रॅमहून अधिक आणि हिऱ्यांचे दागिने 134.91 कॅरेट आहेत. तर वाहनांमध्ये त्यांच्याकडे मारुती स्विफ्टसोबत टीव्हीएस एक्सएल सुपर यांचा समावेश आहे. याशिवाय 5.79 कोटी रुपयांच्या एफडी त्याच्या नावावर आहेत. केवळ विजयच नाही, तर त्याची पत्नी संगीता स्वर्णलिंगम यांच्याकडेही 15.51 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
दरम्यान फेब्रुवारी 2024 मध्ये, विजयने चित्रपटांतून निवृत्ती आणि 'तमिळगा वेट्री कझगम' या आपल्या राजकीय पक्षाच्या स्थापनेसह राजकारणात प्रवेश केला. राजकारणात प्रवेश करताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान विजय आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत तामिळनाडू विधानसभेच्या पेरंबूर आणि त्रिची पूर्व या मतदारसंघांतून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. 'तमिळगा वेट्री कझगम' नावाच्या त्याच्या पक्षातून एकूण 234 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 23 एप्रिल 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत जनमताचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागतो याचा प्रत्यक्ष अनुभव विजय देखील घेणार आहे.