Maulana Jarjis: ‘ श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे…’; मौलाना जरजिस यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रचंड संताप

आपल्या या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेतील एका श्लोकाचा चुकीचा संदर्भ आणि अर्थ लावला आहे.

Maulana Jarjis: ‘ श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे…’; मौलाना जरजिस यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रचंड संताप

Maulana Jarjis: उत्तर प्रदेशातील मौलाना जरजिस यांनी हिंदू धर्माबाबत एक अत्यंत वादग्रस्त विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. भगवान श्रीकृष्ण हे दिवसातून 5 वेळा नमाज पढत असत, असा अजब दावा त्यांनी केला आहे. आपल्या या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेतील एका श्लोकाचा चुकीचा संदर्भ आणि अर्थ लावला आहे. झारखंडमधील एका प्रवचनादरम्यान बोलताना त्यांनी हिंदूंच्या पूजा पद्धतींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जर हिंदू धर्मग्रंथ वाचले, तर त्यांना इस्लामबद्दल प्रेम वाटू लागेल, अशी टिप्पणीही त्यांनी केली. मौलाना जरजिस यांचा हा व्हिडिओ 23 जून रोजीच्या प्रवचनातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

भगवद्गीतेच्या श्लोकाचा विपर्यास

प्रवचनादरम्यान बोलताना मौलाना जरजिस यांनी श्रीमद्भगवद्गीतेच्या 6 व्या अध्यायातील 10 व्या श्लोकाचा चुकीचा अर्थ लावला. ‘योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः…’ हा श्लोक उद्धृत करत त्यांनी दावा केला की, यात संपूर्ण शरीर योगामध्ये (उपासनेत) गुंतवण्यास सांगितले आहे. मौलानांच्या मते, केवळ हात वर करून ‘ओम नमः शिवाय’ म्हणणे ही पूर्ण उपासना नाही, तर नमाजमध्ये होते तसा संपूर्ण शरीराचा सहभाग पूजेमध्ये आवश्यक आहे. पुढे बोलताना त्यांनी भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण यांनीही याच श्रद्धेचा संदेश दिल्याचा दावा करत, इस्लाम हा केवळ मुस्लिमांचा धर्म नसल्याचे म्हटले.

विवादास्पद विधानावर संतप्त प्रतिक्रिया; जीभ कापणाऱ्याला बक्षीस जाहीर

या प्रक्षोभक वक्तव्यानंतर हिंदू समुदायातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अयोध्येतील महंत विष्णू दास यांनी यावर अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली असून, जो कोणी मौलाना जरजिस यांची जीभ कापून आणेल त्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. यापूर्वी मौलाना अरशद मदनी यांनीही अयोध्येच्या न्यायालयीन निकालावर आणि तेथील गर्दीवर आक्षेप घेणारे वक्तव्य केले होते, त्यापाठोपाठ आता जरजिस यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

हेही वाचा – West Bengal Politics: ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का; ‘या’ TMC खासदाराने दिला राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा

हिंदू महासभेची पोलीस ठाण्यात धाव; FIR नोंदवण्याची मागणी

हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी लखनौमधील हजरतगंज पोलीस ठाणे गाठून मौलाना जरजिस यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी केली आहे. हिंदू महासभेचे प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, कधी रामचरितमानस जाळले जाते, तर कधी राम-कृष्णाबद्दल अपमानास्पद विधाने केली जातात, जी आता सहन करण्यापलीकडे आहेत. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची मागणी करत, ‘बुलडोझर’ची कारवाई आता इटावाच्या दिशेने वळवून मौलानांवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

सार्वजनिक वक्तव्यांपासून दूर राहण्याचा ‘जमात-ए-इस्लामी हिंद’चा सल्ला

या संपूर्ण वादावर ‘जमात-ए-इस्लामी हिंद’चे उपाध्यक्ष मलिक मोहतासिम यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारची विधाने सार्वजनिक व्यासपीठांवर केली जाऊ नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले. जर एखाद्या मुस्लिम विद्वानाकडे असे काही विशिष्ट ज्ञान असेल, तर त्यांनी ते सार्वजनिक ठिकाणी मांडण्याऐवजी आपापल्या समुदायातच त्यावर चर्चा करावी, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच सर्वच धर्मीयांनी आपापल्या धर्माच्या मूळ तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number