नीट पेपर फुटी प्रकरणी अभिजीत दिपके आणि सोनम वांगचूक हे दिल्ली येथील जंतर मंतर येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करीत होते. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सोनम वांगचूक यांनी आमरण उपोषणाचा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या उपोषणाचा 20 वा दिवस उजाडला असताना दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना आंदोलन स्थळावरून ताब्यात घेतले. त्यानंतर आज सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच केंद्र सरकारच्या निषेधार्थ सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने नीट पेपरफुटी आणि परीक्षा घोटाळ्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात मोर्चा काढला आहे. या मोर्चामुळे दिल्लीतील जंतरमंतर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान कॉक्रोज जनता पार्टीच्या संसदेबाहेरील मोर्च्याला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली होती. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. हे सरकार मुलांना पूर्णपणे घाबरलं आहे. सरकारला वाटल ह्यांना किड्या, मुंग्यासारख चिरडणार. पण हे झुरळ फार खंबीर आहे अनेक ठिकाणी त्यांना समर्थन मिळतंय, अशा शब्दात सकाळी माध्यमांशी संवाद साधतानाही राऊतांनी सरकारवर टीका केली होती.
संसदेवरील मोर्चाला परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी सोशल मीडियावर टीका करत, “सरकार पोरांना घाबरलेय” असा आरोप केला. तसेच ईडी, सर्वोच्च न्यायालय यांसारख्या संस्थाही मोदी-शाह यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी आपल्या पोस्टमधून केला आहे. यावेळी संजय राऊत पोस्ट करत म्हटले की, “सरकार पोरांना घाबरलेय! शुद्ध मराठीत सांगायचे तर 56 इंच वाल्यांची हातभार फाटलीय! डरो मत! संसदेवरील मार्चला परवानगी नाकारली; शक्य असते तर जंतर मंतर वरील लाखो लोकांना ED लावली असती ; पण ते कठीण आहे! मोर्चा चा मार्ग ED च्या दिशेने वळवायला हवा! Ed,सुप्रीम कोर्ट या सारख्या संस्था मोदी शहांच्या गुलाम झाल्या आहेत!”
सरकार पोरांना घाबरलेय!
शुद्ध मराठीत सांगायचे तर ५६ इंच वाल्यांची हातभार फाटलीय!
डरो मत!
संसदेवरील मार्चला परवानगी नाकारली;
शक्य असते तर जंतर मंतर वरील लाखो लोकांना ED लावली असती ;
पण ते कठीण आहे!
मोर्चा चा मार्ग ED च्या दिशेने वळवायला हवा!
Ed,सुप्रीम कोर्ट या सारख्या संस्था मोदी… https://t.co/XvIUVwQeRx — Sanjay Raut (@rautsanjay61) July 20, 2026