यवतमाळ जिल्ह्याच्या ईसापुरधरण इथं एक लग्न सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या भोजनातून ५० पेक्षा जास्त लोकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, यात लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुसद तालुक्यातील ईसापुरधरण इथं दुपारी एक विवाह समारंभ होता. मोठ्या थाटात वाजत गाजत नवरदेव आपल्या वऱ्हाडासह दाखल झालं. त्यानंतर विवाह सोहळा संपन्न झाला. लग्न समारंभासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी जेवणावर ताव मारला. त्यानंतर दोन तासानंतर अचानक काही जणांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला. एक दोन जणांना आधी त्रास जाणवत होता, त्यानंतर एकएक करून संख्या वाढत गेली. अचानक उलट्या आणि मळमळ होत असल्यामुळे एकच खळबळ उडाली.
जेवणातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही विषाधा नेमकी कशामुळे झाली? कुणी मुद्दाम तसं कृत्य केलं का? किंवा शिळा असलेल्या भाजीपाल्याचा वापर केला का? नेमकं कोणत्या पदार्थातून विषबाधा झाली आहे? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही? संबंधित घटनेमुळे परिसरात घळबळ उडाली आहे. वऱ्हाडी रूग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वाढण्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे. रूग्णालय प्रशासन याप्रकरणी सतर्क झाले असुन रूग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.