देशात कोरोनाग्रस्त परिस्थिती स्थिरावताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. देशातील ९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून केंद्रीय पथके पाठवण्यात आली आहे.
हरियाणा, पंजाब, केरळ, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू-काश्मीर या राज्यांत डेंग्यू रुग्णांची संख्या वाढतत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून या ९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केंद्रीय पथके पाठवण्यात आली आहे. डेंग्यूचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपयांसह तांत्रिक मार्गदर्शन देण्याचे कार्य ही पथके करणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये डेंग्यू रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर मृत्यूचा आकडाही वाढत आहे. मागील आठवड्यात दिल्लीमध्ये डेग्युमळे ५ नागरिकांना जीम गमवावा लागला आहे. तसेच दिल्लीत गेल्या आठवड्यात ५३१ नव्या डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना पाठोपाठ डेंग्यू रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून केंद्रीय पथके पाठवण्यात आली आहे.