अकोल्यात बुधवारपासून रात्रीची संचारबंदी

  त्रिपुरा हिंसाचार घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले असून आता अकोल्यातील अकोट शहरासह अकोला जिल्ह्यात आजपासून जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अकोला शहरात कलम १४४ लागू करण्यात आला असून सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश आणि सायंकाळी ७ ते सकाळी ६ वाजे पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.   अकोल्यातील अकोट […]

अकोल्यात बुधवारपासून रात्रीची संचारबंदी

  त्रिपुरा हिंसाचार घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले असून आता अकोल्यातील अकोट शहरासह अकोला जिल्ह्यात आजपासून जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अकोला शहरात कलम १४४ लागू करण्यात आला असून सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश आणि सायंकाळी ७ ते सकाळी ६ वाजे पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.

  अकोल्यातील अकोट शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून अकोटमधील इंटरनेट सेवासुद्धा बंद करण्यात आली आहे. अकोट शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अकोटमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. अकोट शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता अमरावती, अकोटसह अकोलामध्येही सकाळी ६ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदी आणि संध्याकाळी ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number