Nepal Currency: नेपाळच्या नव्या 100 रुपयांच्या नोटेवर वादग्रस्त नकाशा; भारताने घेतला आक्षेप

भारताने हा निर्णय एकतर्फी आणि अवैध असल्याचे सांगितले. वादग्रस्त नकाशा छापल्याने दोन्ही देशांमध्ये राजनैतिक तणाव वाढण्याची शक्यता आहे.

Nepal Currency: नेपाळच्या नव्या 100 रुपयांच्या नोटेवर वादग्रस्त नकाशा; भारताने घेतला आक्षेप

चीनने अरुणाचल प्रदेशावर दावा करत निर्माण केलेल्या तणावात आता नेपाळनेही भर घातली आहे. नेपाळच्या केंद्रीय बँकेने Nepal Rastra Bank (NRB) 100 रुपयांची नवी नोट जारी केली आहे. या नोटेवर छापलेला सुधारित नकाशा भारतासाठी चिंतेचा विषय ठरला आहे, कारण या नकाशात Kalapani, Lipulekh आणि Limpiyadhura हे भारताचे क्षेत्र नेपाळचा भाग म्हणून दाखवले आहेत. त्यामुळे सीमावादाचा मुद्दा पुन्हा चिघळला आहे.

भारताने नेपाळच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत सांगितले की सीमावादाचा इतिहास, कागदपत्रे आणि करार पाहता हे क्षेत्र भारताचा भाग असल्याचे स्पष्ट आहे. चीन आधीच अरुणाचलवर दावा करून परिस्थिती गुंतागुंतीची करत असताना नेपाळनेही असा पाऊल उचलणे हा आक्षेपार्ह प्रकार असल्याचे भारताचा सूर आहे. नेपाळच्या राष्ट्र बँकेने स्पष्ट केले की जुन्या 100 रुपयांच्या नोटेवरही नकाशा होता, मात्र सरकारच्या नव्या नकाशा निर्णयानुसार ते सुधारित करण्यात आले आहे. तसेच 10, 50, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर नकाशा नसतो; केवळ 100 रुपयांच्या नोटेवरच नकाशा छापण्याची परंपरा कायम आहे.

हेही वाचा: Hong Kong Fire Tragedy: मानवनिर्मित आपत्ती? हॉंगकॉंग आगीत 94 मृत, रहिवाशांचे गंभीर आरोप

नव्या नोटेचे डिझाईन विशेष का? नोटेच्या डिझाइनमध्ये अनेक नवे घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. डाव्या बाजूला Mount Everest चे सुंदर चित्र उजव्या बाजूस लाल गुरांस (Rhododendron) फुलाचे वॉटरमार्क. मध्यभागी हलक्या हिरव्या रंगात दिसणारा नेपाळचा नकाशा, नकाशाशेजारी Ashoka Pillar आणि Lumbini अशी नोंद. मागील बाजूस एक सिंग असलेल्या Rhino चे चित्र सुरक्षेसाठी Security Thread आणि दृष्टीहीनांना ओळखता यावे म्हणून Raised Black Dot.

मे 2020 मध्ये तत्कालीन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या सरकारने समान नकाशा जाहीर केला होता. त्या नकाशाला नेपाळच्या संसदेनेही मंजुरी दिली होती. त्या वेळी भारताने हा निर्णय एकतर्फी आणि अवैध असल्याचे सांगत जोरदार आक्षेप घेतला होता. आता नवीन नोटेमुळे जुना वाद पुन्हा समोर आला आहे. नेपाळ आणि भारतामध्ये अंदाजे 1850 km अशी सामायिक सीमा असून ती सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमधून जोडली जाते. भारतीय बाजारात 100 नेपाळी रुपये म्हणजे सुमारे 62.56 भारतीय रुपये एवढी किंमत होते. नेपाळच्या या नवीन नोटेमुळे सीमावाद पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

भारताने यावर औपचारिकरित्या आक्षेप नोंदवला असून पुढील काही दिवसांत या मुद्द्यावर राजनैतिक हालचाली वेगाने होतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: SEBI : गुंतवणूक सल्लागार सेबीच्या रडारवर, 68 जणांची नोंदणी रद्द, जाणून घ्या नेमकं काय झालं?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number