Arunachal Pradesh Landslide : अरुणाचल प्रदेशात निसर्गाचा कोप; ढगफुटी अन् दरडी कोसळून 4 जणांचा मृत्यू, 5 जवान बेपत्ता

राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाने शनिवारी, 15 ऑगस्ट रोजी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, दिबांग व्हॅली आणि अप्पर सुबनसिरी या दोन जिल्ह्यांना या आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला आहे.<br/>

Arunachal Pradesh Landslide : अरुणाचल प्रदेशात निसर्गाचा कोप; ढगफुटी अन् दरडी कोसळून 4 जणांचा मृत्यू, 5 जवान बेपत्ता

Arunachal Pradesh Landslide :  अरुणाचल प्रदेशातील विविध भागांत निसर्गाने रौद्ररूप धारण केले असून मुसळधार पाऊस, पुराचे लोट आणि दरडी कोसळल्यामुळे मोठी प्राणहानी झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या नैसर्गिक आपत्तींमध्ये 4 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर भारतीय लष्कराचे 5 जवान बेपत्ता झाले आहेत. राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाने शनिवारी, 15 ऑगस्ट रोजी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, दिबांग व्हॅली आणि अप्पर सुबनसिरी या दोन जिल्ह्यांना या आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला आहे.

अप्पर सुबनसिरी येथे दरड कोसळून 4 कामगारांचा अंत

अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात रस्ते बांधकामाचे काम सुरू असताना अचानक डोंगराची भलेमोठी दरड कड्यावरून खाली कोसळली. या दुर्घटनेत तिथे काम करणारे अनेक कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. बचाव पथकाने युद्धपातळीवर काम करत 4 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मृतांमध्ये ताडू बाकी, ताजी राय, मार्कोश बसुमतारी आणि बाबुल अली यांचा समावेश असून बाबुल अली यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. उर्वरित मृतदेहांचा शोध घेण्यासाठी नाचो पोलीस ठाण्याचे कर्मचारी, दापोरीजो येथील अग्निशमन दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (SDRF) जवान अथक प्रयत्न करत आहेत.

दिबांग व्हॅलीत पुराचा तडाखा: लष्कराचे तंबू वाहून गेले

दुसऱ्या एका दुर्घटनेत, दिबांग व्हॅली जिल्ह्यातील 'पशु पाणी' लष्करी तळावर ढगफुटीसदृश पावसामुळे अचानक भीषण पूर आला. या पुराच्या प्रचंड वेगात '5 व्या ग्रेनेडियर्स' तुकडीचे 2 निवारा तंबू वाहून गेले. पुराच्या लाटांमध्ये लष्कराचे 7 जवान वाहून गेले होते. त्यापैकी 2 जवानांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले, मात्र 5 जवान अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता जवानांमध्ये हवालदार उपेंद्र यांच्यासह कुंदन, विनोद, आदित्य आणि समुंदा या सैनिकांचा समावेश आहे.

हेही वाचा – Mumbai-Delhi Expressway Accident: मुंबई-दिल्ली महामार्गावर भीषण अपघात; ओव्हरटेकिंगच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

बचावकार्यासाठी विविध यंत्रणांचे संयुक्त अभियान

बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी लष्कराच्या 5 व्या ग्रेनेडियर्सची 2 शोध पथके तत्काळ रवाना करण्यात आली आहेत. या मोहिमेत आयटीबीपीची (ITBP) 58 वी बटालियन, जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्सची 62 आरसीसी (RCC) तुकडी, पासीघाट येथील एसडीआरएफचे जवान आणि स्थानिक पोलिसांचे पथक दिवस-रात्र एक करत आहे. दुर्गम भाग आणि प्रतिकूल हवामानामुळे बचावकार्यात मोठे अडथळे येत असले, तरी स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने लष्कर व प्रशासनाकडून शोधमोहीम वेगाने राबवली जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number