BR Gavai : सरन्यायाधीश गवईंकडून हिंदूंच्या देवतांचा अपमान, कोर्टातच वकिलाचं उग्र आंदोलन; नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने कोर्टात घोषणाबाजीही केली. नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढले. यामुळे काही काळ कोर्टाचे कामकाज विस्कळीत झाले.

BR Gavai : सरन्यायाधीश गवईंकडून हिंदूंच्या देवतांचा अपमान, कोर्टातच वकिलाचं उग्र आंदोलन; नेमकं काय घडलं?

सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान एका वकिलाने भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई यांच्यावर वस्तू फेकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. समोर आलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने कोर्टात घोषणाबाजीही केली. नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढले. यामुळे काही काळ कोर्टाचे कामकाज विस्कळीत झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयात उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की अटक केलेल्या व्यक्तीने घोषणा दिल्या – सनातन धर्माचा अपमान, भारत हे सहन करणार नाही.  काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, "त्या व्यक्तीने सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला", तर काहींनी सांगितले की "सरन्यायाधीशांवर कागदाचा गुंडाळण्यात आला. असाही दावा करण्यात आला की तो माणूस वकिलाच्या वेशात होता".

दरम्याने आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे , या  घटनेने सरन्यायाधीशांना काहीही फरक पडला नाही आणि त्यांनी न्यायालयात उपस्थित असलेल्या इतर वकिलांना त्यांचे युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगितले. ते म्हणाले, "या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आम्हाला काहीही फरक पडत नाही. या गोष्टींचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही."

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number