आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात अपघात झाला आहे. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास पोलादपूरजवळ कशेडी घाटात भरधाव वेगातील टँकरने त्यांच्या गाडीला उडवले आहे. सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप असून गाडीच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असताना कशेडी घाटात पोलादपूरजवळ चोळई येथे मागून येणाऱ्या भरधाव टँकरने जोरदार त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली.
योगेश कदम यांना Y+ सुरक्षा आहे. त्यांच्या गाडीसोबत पोलिसांची गाडी होती. अपघात झालेल्या ठिकाणी यापुर्वी अनेकदा अपघात झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक अपघात सातत्याने होत आहे. त्यानंतर दखल घेतली जात नाही. योगेश कदम अपघातातून वाचले नसते तर काही उपययोजना सुरु झाली असती, असा आरोपच आमदार योगेश कदम यांनी केला. हिवाळी अधिवेशात मुंबई-गोवा महामार्गाचा विषय मांडला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्माक असल्याचे सांगितले.
दरम्यान, टँकर गाडीला धडकल्याने पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मागील काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांच्या गाडीच्या अपघाताची मालिका सुरू असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणं टाळा, अशी विनंती करण्यात येत आहे.