Ujjain Mahakal Temple: भस्म आरती ते शयन आरती… उज्जैनच्या महाकाल मंदिरात नवीन सशुल्क व्यवस्था लागू; भाविकांसाठी मंदिर प्रशासनाची नियमावली

आता भाविकांना ऑनलाईन बुकिंगद्वारेच प्रवेश मिळणार असून, तत्काल स्लॉटसाठी 200 रुपये शुल्क आकारले जाईल.

Ujjain Mahakal Temple: भस्म आरती ते शयन आरती… उज्जैनच्या महाकाल मंदिरात नवीन सशुल्क व्यवस्था लागू; भाविकांसाठी मंदिर प्रशासनाची नियमावली

उज्जैनमधील महाकाल मंदिर प्रशासनाने भस्म आरतीसाठी ऑफलाइन परवानगी व्यवस्था पूर्णपणे बंद केली आहे. आता भाविकांना भस्म आरतीत सहभागी होण्यासाठी केवळ ऑनलाईन बुकिंगच करावी लागणार आहे. याआधी मंदिरातील काउंटरवरून मोफत परवानगी दिली जात होती, मात्र त्यासाठी अनेक तास रांगेत उभे राहावे लागत होते. अनेकदा भाविकांना पाच ते सहा तास प्रतीक्षा करावी लागत होती.

महाकाल मंदिर प्रशासनाने सांगितले की, पूर्वी ऑफलाइन पद्धतीने दिले जाणारे 300 परवाने आता ऑनलाईन ‘तत्काल’ कोट्यात रूपांतरित करण्यात आले आहेत. दर्शनाच्या तारखेच्या एक दिवस आधी सकाळी 8 वाजता ही बुकिंग विंडो सुरू होईल. उदाहरणार्थ, 17 एप्रिलच्या भस्म आरतीसाठी 16 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता ऑनलाईन स्लॉट उपलब्ध होतील.

या नव्या ‘तत्काल’ ऑनलाईन बुकिंगसाठी प्रति व्यक्ती 200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. याआधी ऑफलाइन परवानगी मोफत मिळत होती. मंदिर प्रशासनाच्या मते, डिजिटल सुविधा टिकवून ठेवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांचे व्यवस्थापन करण्यासाठी हे शुल्क आकारले जाणार आहे.

हेही वाचा: Train Accident: चूक एकाची, बळी पाच जणांचा! रेल्वेमधून खाली उतरणे पडले महागात; पुरुषोत्तम एक्सप्रेसच्या धडकेत पाच प्रवाशांचा जागीच अंत

याशिवाय, नियमित भस्म आरतीसाठी आगाऊ बुकिंगच्या नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. पूर्वी भाविकांना तीन महिने आधी बुकिंग करता येत होते, मात्र आता ही मर्यादा एक महिन्यापर्यंत कमी करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, जून महिन्यातील भस्म आरतीसाठी बुकिंग 1 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरू होईल.

मंदिर प्रशासनाने संध्याकाळची संध्या आरती आणि रात्रीची शयन आरती यासाठीही सशुल्क प्रवेश व्यवस्था लागू केली आहे. या आरतीदरम्यान बसून दर्शन घ्यायचे असल्यास भाविकांना 250 रुपये शुल्क भरावे लागेल. मात्र चालत दर्शन घेण्याची सुविधा मोफतच राहणार आहे.

संध्या आरतीसाठी ऑनलाईन बुकिंग दररोज दुपारी 12 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश दिला जाईल. तर शयन आरतीसाठी बुकिंग संध्याकाळी 4 वाजता सुरू होईल आणि रात्री 10 वाजेपर्यंत प्रवेश मिळेल. मंदिर प्रशासनाने या नव्या बदलांमुळे गर्दीचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने होईल आणि भाविकांना अधिक सुलभ अनुभव मिळेल, असा दावा केला आहे. 

हेही वाचा: Devendra Fadnavis: . '2029 मध्ये लोकसभेत दिसणार महिलांचे अभूतपूर्व वर्चस्व'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला महिला खासदारांच्या संख्येचा मोठा आकडा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number