पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल शहीद

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल शहीद झाले. ते 26 वर्षांचे होते. लेफ्टनंट विनय नरवाल हरियाणातील कर्नालचे रहिवासी होते.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल शहीद

हरियाणा: मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल शहीद झाले. ते 26 वर्षांचे होते. लेफ्टनंट विनय नरवाल हरियाणातील कर्नालचे रहिवासी होते. पाच दिवसांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. रजेवर असतानाच ते त्यांच्या पत्नीसोबत फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते. मात्र, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झाले.

पाच दिवसांपूर्वी लेफ्टनंट विनय नरवाल यांचे लग्न झाले होते:

लेफ्टनंट विनय नरवाल कोची येथे कार्यरत होते. 16 एप्रिल रोजी त्यांचे लग्न झाले आणि 19 एप्रिल रोजी त्यांचे रिसेप्शन झाले. त्यानंतर हे नवदाम्पत्य काश्मीरला रवाना झाले. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वीच ते नौदलात भरती झाले होते. शहीद झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि नौदलातील सहकाऱ्यांना जबर धक्का बसला आहे. शेजारच्यांनी आणि गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे. 'लेफ्टनंट विनय नरवाल एक हुशार अधिकारी होते,' असे लोकांनी म्हटले आहे.

शहीद लेफ्टनंट नरवाल यांच्या वडिलांची प्रतिक्रिया:

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांचे वडील म्हणाले, 'माझा मुलगा एका शूर सैनिकाच्या भूमिकेत शहीद झाला. सरकार आपले काम करत आहे आणि आम्हाला सरकारवर विश्वास आहे, ते न्याय देतील'. 

हेही वाचा: संरक्षक मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठकीला सुरूवात

शहीद लेफ्टनंट नरवाल यांचे वडील भावुक होत म्हणाले:

'विनय खूप चांगला मुलगा होता. तो एका शूर सैनिकासारखा मरण पावला. संपूर्ण देश माझ्यासोबत आहे. देव माझ्या कुटुंबाला या असह्य वेदना आणि कधीही भरून न येणारे नुकसान सहन करण्याची शक्ती देईल. या घटनेमुळे माझ्या सुनेला सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अनेक महत्वाची पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची अर्धवट भेट थांबवून भारतात परत आले, हे एक मोठे पाऊल आहे', शहीद लेफ्टनंट नरवाल यांचे वडील भावुक होत म्हणाले. 

मुलाबद्दल सांगताना ते म्हणाले, 'माझा मुलगा एक हुशार विद्यार्थी होता आणि नेहमीच पहिला येत होता. त्याला भारतीय हवाई दलात फायटर पायलट व्हायचे होते, परंतु त्याच्या उंचीमुळे निवड झाली नाही आणि शेवटी त्याने भारतीय नौदलात सेवा करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला सरकारवर पूर्ण विश्वास आहे आणि आशा आहे की सरकार या प्रकरणात आवश्यक ती कारवाई करेल'. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number